व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स सर्व्हिसेस ऍण्ड ऍग्रीकल्चरचा दहावा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात चिंचवड येथे साजरा करण्यात आला. यावेळी चेंबरचे संस्थापक आणि अध्यक्ष ऍड. आप्पासाहेब शिंदे, सचिव रंगनाथ गोडगे-पाटील, चेंबरचे रामदास माने, प्रदिप वैद्य, विश्वास जगताप, व्हि. एस. काळभोर, जयंत कड, प्रमोद राणे, योगेश बाबर, विनोद बंन्सल आदी उपस्थित होते. अध्यक्ष ऍड. शिंदे यांनी एमआयडीसीला स्वतंत्र औद्योगिक दर्जा का द्यावा लागेल, याबाबत सविस्तर माहिती दिली.