व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगरसदस्या अनुराधा गोरखे व सह आयुक्त दिलिप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त आशा देवी दुरगुडे व अण्णा बोदडे यांच्या हस्तेही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पाजली अर्पण करण्यात आली. या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, संतोष जाधव, आकाश चव्हाण, बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ राठोड, गुलाब राठोड व रवि गोरसिकवाडी कर्मचारी रवि राठोड, बालाजी रोठोड, सीताराम राठोड व रावसाहेब राठोड आदि उपस्थित होते.