व्हीएस न्यूज- भरधाव वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास माण येथे घडली.
बाळु पांडुरंग भवाळ (वय 50, रा. माण, ता.मुळशी) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. भवाळ हे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास रस्तयाने पायी जात होते. यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनासहित पसार झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.