Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
निगडी सांस्कृतिक कार्यक्रमात सात राज्यातील कलाकारांचा सहभाग..

व्हीएस न्यूज त्रिपुरा, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालॅंड, सिक्कीम या पूर्वोत्तर सात राज्यातील कलाकारांनी अप्रतिम सौंदर्यपूर्ण नृत्ये सादर करुन रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निगडीतील नंदकिशोर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सात राज्यातील अडीचशे कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी सीआरपीएफचे उपकमांडंट सचिन गायकवाड, राज्य निदेशक संध्या देवताळे,मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिध्द कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका अश्‍विनी बोबडे,माजी नगरसेविका सुलभा उबाळे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, सामाजिक कार्यकर्ते दीपक मोढवे पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी गणेश वंदना, कथक रंगमंच प्रणाम, तराना, नादी आदी विविध नृत्य प्रकार सादर केले. यानंतर बाहेरील राज्यातून आलेल्या कलाकारांचे सादरीकरण सुरु झाले. प्रथम त्रिपुरा राज्यातील कलाकारांचे सुंदर लोकनृत्य झाले. आसाम येथील कलाकारांनी पारंपारीक बिहू नृत्य सादर करत दाद मिळवली. मिझोराम राज्यातील कलाकारांनी सरलाम काई व तलंगलाम ही आकर्षक नृत्य सादर केली. अरुणाचर प्रदेशातील कलाकारांनी भुरी नाईझिर नृत्य पेश केले. मणिपूर राज्यातील कलाकारांनी अभिसार, खांबा थोईबी, मार्शल आर्टसह मिटी जागोई अशी विविध नृत्ये सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली. नागालॅंड राज्यातील कलाकारांनी नृत्याव्दारे स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवले. सिक्कीम राज्यातील कलाकारांनी नेपाली व लेपचा नृत्य सादर करुन रसिकांना डोलायला लावले.

कलाकारांची महापालिकेला भेट

मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा व नागालॅंड या पूर्वोत्तर राज्यातील कलाकारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. उपमहापौर शैलजा मोरे,आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या अनुराधा गोरखे, डॉ. नंदकिशोर कपोते, संध्या देवतळे, यशवंत मानखेडकर, व्ही. डी. काळे, कुसूम ससाणे, कार्यालयीन अधिक्षक हरी ठाकरे, संजय कुरणे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी प्रवीण निकम, दहा वर्षांचा बाल शास्त्रज्ञ हेमांग येलोरे आदी उपस्थित होते. श्रावण हर्डीकर व एकनाथ पवार यांनी कलाकारांशी संवाद साधला. सूत्रसंचालन यशवंत मानखेडकर यांनी केले. रमेश भोसले यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
‘जैव पदार्थांचा प्रतियौगी औषधांमध्ये वापरा’वर राष्ट्रीय परिषद संपन्न

व्हीएस न्यूज येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स ऍण्ड रिसर्च आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये जैवपदार्थांचा प्रतियौगी औषधांमध्ये करण्यात येणारा वापर आणि जैवपदार्थामधील विविध संशोधनात्मक संधीयावर माहिती देण्यात आली.

परिषदेचे उद्‌घाटनाच्या वेळी राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळा पुणेचे वरिष्ठ संशोधक डॉ. पंकज पोतदार, प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, समन्वयक डॉ. आशा थॉमस आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. पोतदार यांनी मल्टिफंक्‍शनल प्लाटफोर्मास फॉर मल्टिमोडेल एमेजिंग, बायोसेन्सर डिटेशन, ड्रग डिलेव्हरी आणि रिव्हर्सल ऑफ न्युरोडिजनरेशनया विषयाखाली मार्गदर्शन केले.

यानंतर आगरकर इन्स्टिट्यूट ऑफ पुणेच्या डॉ. रिंकू उमराणी यांनी नॅनोमटेरिअल फॉर पॅनक्रियाटिक बिटा सेल रिजरेशन थेरपी फॉर डायबेटीसयावर ओर्थोक्राफ्ट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. पियुष जोशी यांनी पोलिमेरिक बायोमटेरियल आणि सायन्स इंटरप्रेनरशिपया विषयावर मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये संशोधक पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी गटातून शाहरूख खान (प्रथम), निखिल लोहे (द्वितीय), रूपाली हंडाल, पूनम पेटकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. शेजल गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रितेश भोळे यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
रेडझोन संदर्भात खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील रेडझोनची हद्द कमी करणे, मावळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेत चर्चा केली.

या शिष्टमंडळात आमदार बाळा भेगडे, देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाअध्यक्ष विशाल खंडेलवाल, सुदाम तरस, कैलास पानसरे, मदन सोनिगरा, निवृत्त ब्रिगेडियर एस. के. मोहन उपस्थित होते. मावळ, पिंपरी चिंचवड भागातील रेड झोनची हद्द कमी करण्यासंदर्भात तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बरोबर 17 मार्च 2014, 16 मार्च 2016 व एप्रिल2016 रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीच्या दरम्यान ऑगस्ट 2017 पर्यंत रेड झोनबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पर्रीकर यांनी दिले होते. परंतू पर्रीकर यांना गोव्यात परत जावे लागले. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या बरोबरही या अगोदर दोन बैठका झाल्या आहेत. सबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून या प्रश्नाबाबत त्या माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा खासदार बारणे यांनी शिष्टमंडळासमवेत संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.

या बैठकीत रेड झोनची हद्द कमी करण्याबरोबरच मावळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा या मागणीवर चर्चा झाली. याबाबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रश्नासंदर्भात आजून काही काळ लागणार असल्याचे सांगितले. या दोन्ही प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून रेड झोनची हद्द कमी करणे हा देश पातळीवरील निर्णय असल्यामुळे यासाठी काही काळ जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच मिसाईल प्रकल्पाच्यासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्याचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यामध्ये महाराष्ट्र सरकार जर सकारात्मक भूमिका घेणार असल्यास तोही विषय मार्गी लावण्यास मदत करणार असल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
महाराष्ट्रासह इतर राज्यात बनावट नोटा पुरविणा-यास पुण्यातून अटक


व्हीएस न्यूज - महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारताच्या इतर भागांमध्ये भारतीय चलनाच्या बनावट नोटा पुरवणा-या एका इसमाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या साथीदाराला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) नुकतीच केली.

दलाम मिया (रा. देवनापूर, मालदा, पश्चिम बंगला), अशोक महादेव कुंभार (रा. चिक्कोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एनआयए मुंबई शाखेला एक विश्वसनीय माहिती मिळाली होती की, दलाम मिया हा बनावट नोटा चलनात आणणा-या टोळीत काम करत आहे. त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारताच्या इतर भागांतील विविध ठिकाणी भारतीय चलनाच्या बनावट नोटा पुरविल्या आहेत. त्यानुसार त्याचा शोध घेत असताना तो पुण्यामध्ये असल्याचे समजले. एनआयएच्या अधिका-यांनी दलाम मियाला पुण्यातून अटक केली.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा एक साथीदार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दलाम मिया याचा साथीदार अशोक कुंभार याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. अशोक कुंभार याच्याकडून ८२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटा या हुबेहुब ख-या नोटां सारख्या दिसतात. सामान्य माणसाला खरी आणि खोटी नोट ओळताही येणार नाही अशा पद्धतीने या नोटांची छापाई करण्यात आली आहे. या नोटांची छापाई सीमेपलीकडे करुन त्या भारतात आणून चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय अधिका-यांनी केला आहे.

...Read More

V. S. News
सांगवीच्या विकासकामांत प्रशांत शितोळेंचे राजकारण

भाजप नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन…

व्हीएस न्यूज - प्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचे आणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून तसेच द्वेष आणि मत्सरापोटी स्मशानभूमी तसेच रस्त्यांची कामे अडविली आहेत. स्मशानभूमी सारख्या भावनिक मुद्द्यावर शितोळे राजकारण करत आहेत. त्याला भीक न घालता प्रशासनाने सांगवी भागातील रस्त्यांची कामे तसेच स्मशानभूमीचे काम पूर्ण करून या भागातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या प्रभागाच्या ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक ढोरे, कांबळे व नगरसेविका सोनवणे यांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेने गेल्या पंचवार्षिकला प्रभाग क्रमांक ३२ मध्ये स्मशानभूमी उभारली आहे. या प्रभागातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन स्मशानभूमीची आवश्यकता होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करून नागरिकांसाठी स्मशानभूमी बांधली. परंतु, त्यासाठी बसविण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीत मयताच्या टाळूवरचे लोणे खाण्याचा प्रकार झाल्यामुळे या प्रभागाची प्रचंड बदनामी झाली. या भ्रष्टाचाराचे पाप संबंधितांना फेडावे लागले. ही स्मशानभूमी बांधताना त्याला कोणीही आडकाठी आणली नाही. परंतु, महापालिका निवडणुकीतील जय-पराजयानंतर स्मशानभूमीवरून नागरिकांना वेठीस धरण्याचेकाम सुरू आहे. पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून शितोळे याभागात होणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी या स्मशानभूमीचे काम अडविले आहे. सार्वजनिक असलेल्या रस्त्यांचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी रस्त्यांची कामे त्यांनी अडविली आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मत्सर आणि द्वेषापोटी नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. या सर्व अडवाअडवीच्या राजकारणामुळे याभागातील नागरिक आगामी काळात त्यांचे जिरवण्याचे काम निश्चित करतील. परंतु, या राजकारणाला महापालिका प्रशासनाने बळी न पडता प्रभाग क्रमांक ३२ मधील कामे गतीने मार्गी लावावीत.

या भागातील सर्वच कामांसाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. लोकहिताच्या कामासाठी कोणाच्या दबावाला बळी पडण्याची अधिकाऱ्यांना गरज नाही. त्यामुळे या बाबीची आपण स्वतः गंभीर दखल घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांना कामे मार्गी लावण्यासाठी आपण आदेश द्यावेत. प्रभागातील नागरिकांची तातडीची गरज लक्षात घेऊन स्मशानभूमी उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. रस्त्यांची कामे अडविण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनाने संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करावी. यापुढे विकासकामे अडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला रस्त्यावर उतरून उत्तर देण्याचा इशारा या चारही नगरसेवकांनी दिला आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवड शहरातील १ लाख १३ हजार मिळकतींना जप्तीची नोटीस

व्हीएस न्यूज - मिळकत कराची थकबाकी ५ हजार रुपये पेक्षा अधिक असणाऱ्या मिळकतधारकांना नोटीसा बजाविल्यानंतरही सात दिवसांच्या आत मिळकत कराची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे अशा १ लाख १३ हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतर मिळकतीवर जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत ३ जानेवारी अखेर ज्या मिळकतधारकांकडे ५ हजार रुपयेपेक्षा जास्त थकबाकी आहे. अशा १ लाख १३ हजार ३७२ मिळकत धारकांना मिळकत कर भरण्याच्या नोटीसा देण्यात येत आहेत. नोटीस बजावुनही मिळकत कराची थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास अशा थकबाकीधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

आजअखेर २ लाख ७८ हजार मिळकत धारकांनी ३८० कोटी ४३ लाख एवढा मिळकतकराचा भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख १८ मिळकत धारकांनी ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करून १३५ कोटी ६० लाख रुपये भरणा केला आहे. नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व कर संकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत.

मिळकत करधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा उपयोग घेणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

पिंपरी – महापालिका…

पिंपरी-चिंचवड शहरातील १ लाख १३ हजार मिळकतींना जप्तीची नोटीस

व्हीएस न्यूज - मिळकत कराची थकबाकी ५ हजार रुपये पेक्षा अधिक असणाऱ्या मिळकतधारकांना नोटीसा बजाविल्यानंतरही सात दिवसांच्या आत मिळकत कराची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे अशा १ लाख १३ हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतर मिळकतीवर जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत ३ जानेवारी अखेर ज्या मिळकतधारकांकडे ५ हजार रुपयेपेक्षा जास्त थकबाकी आहे. अशा १ लाख १३ हजार ३७२ मिळकत धारकांना मिळकत कर भरण्याच्या नोटीसा देण्यात येत आहेत. नोटीस बजावुनही मिळकत कराची थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास अशा थकबाकीधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

आजअखेर २ लाख ७८ हजार मिळकत धारकांनी ३८० कोटी ४३ लाख एवढा मिळकतकराचा भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख १८ मिळकत धारकांनी ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करून १३५ कोटी ६० लाख रुपये भरणा केला आहे. नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व कर संकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत.

मिळकत करधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा उपयोग घेणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन 

व्हीएस न्यूज - श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील राजगुरव कॉलनीमधील श्री गणेश मंदिर प्रांगणात आयोजित व्याख्यानमालेचे उद्‌घाटन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते उद्या (गुरुवार) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक गणेश खांडगे, संतोष शिंदे, नगरसेविका नीता काळोखे, काजल गटे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे आदी उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे 'छत्रपती शिवाजी महाराज' हा विषय मांडतील. शुक्रवारी कीर्तनकार डॉ.जयंत करंदीकर 'सुखी जीवनाची गुरूकिल्ली' या विषयावर तर व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प शनिवारी ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन गुंफणार असून 'अशांत सीमा आणि अस्वस्थ भारत' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
महिलांनी आपल्या कार्यातून स्वतःला सिद्ध करावे

व्हीएस न्यूज - महिलांना स्वतःमधल्या सुप्त गुणांची जाणीव व्हायला हवी. महिलांनी आणि पुरुषांनी बरोबरीने काम करुन आपली योग्यता सिद्ध करावी. आपण केलेलं चांगलं कार्य आपल्याला विकासाच्या पथावर घेऊन जातं. महिलांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरून रडत बसू नये. प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढत महिलांनी स्वतः मधे असणाऱ्या शक्तींना ओळखून आपल्या कार्यातून स्वतःला सिद्ध करावं. असे प्रतिपादन सुरेखा कटारिया यांनी केले.
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात 'स्वयंसिद्धा प्रतिष्ठान' च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त 'एकाच या जन्मी जणू' या अतंर्गत 'स्त्री जाणीवा' या विषयावरील नृत्य, नाटक, पोवाडा व समुहगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कटारिया बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ कवयिञी अंजली कुलकर्णी तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी यांची होती. राज अहेरराव, राजेंद्र घावटे, नितिन हिरवे, कवी नंदकुमार मुरडे, आश्विनी बावीसकर, विजय जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खिवंसरा पाटील विद्यालयातील विद्यार्थींनीने माता भगिनींचा सन्मान व्हावा महत्व नारीच जाणून घ्यावा हे समुहगीत गायले. यावेळी समृद्धी ,सुर्वे मानसी चिटणीस, संयोगिता खुडे, आश्विनी मोरे, सरीता सावकर, दिपाली शिंदे, डॉ. नंदा हरम, मनीषा आवेकर, ज्योती सरदेसाई, सुनीता देशपांडे, राणी तांगडे यांच्यासह 70 महिलांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन नंदकुमार मुरडे, ज्ञानेश्वर भंडारे, मनिषा पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र काकंरिया यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन दिनेश भोसले यांनी तर आभार वर्षा बालगोपाल यांनी मानले.

...Read More

V. S. News
डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाचे स्नेह संमेलन 

व्हीएस न्यूज - दरवर्षीप्रमाणे डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी येथे दृष्टी 2018 हा वार्षीक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुगे हवेत सोडून करण्यात आले. विदयार्थ्यांनी त्यांच्यातील विविध कलागुणांचे दर्शन या कार्यक्रमात उपस्थितांना घडवून आणले. गायन, विविध सांस्कृतीक तसेच पाश्चात्य नृत्यप्रकार, विविध नाटयप्रसंग या ठिकाणी विदयार्थ्यांनी सादर केले. तृतीय वर्षे बी.फार्मच्या मुलांनी सोशल ईलनेसफ या विषयावर सादर केलेला फॅशनशो कार्यक्रमाचे प्रमुख आर्कषण ठरला.तसेच द्वितीय वर्षे बी.फार्म मुलींनी सादर केलेल्या फॅशनशो च्या माध्यमातून त्यांनी स्त्री सुरक्षेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले.
आधुनिकतेने भरलेल्या या कार्यक्रमात वैभव दाणी या विदयार्थ्याचा मराठी अभंग तसेच अभिलाषा हर्णे या विदयार्थीनीने प्रस्तुत केलेली शिवस्तुती आपली वेगळीच छाप सोडून गेली. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अंतीम वर्षातील विदयार्थ्यांनी प्राचार्य डॉ.निरज व्यवहारे तसेच महाविदयालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मुकेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. अभिषेक स्वामी याने आभार मानले.

...Read More

V. S. News
शहाजीराजे भोसले यांच्या 424 व्या जयंती महोत्सवानिमित्त वेरुळ येथे विविध कार्यक्रम 

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र शासन आणि स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 मार्च रोजी शहाजीराजे भोसले यांची 424 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खा. संभाजीराजे भोसले (कोल्हापूर घराणे), प्रिन्स ऑफ तंजावर म्हणजे तंजावर घराण्याचे राजे शिवाजीराजे भोसले आणि नागपूर घराण्याचे राजे राजे मुधोजी भोसले या राजघराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली वेरुळ येथे हा सोहळा संपन्न होत आहे, अशी माहिती शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विलास पांगारकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन गावंडे, शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजू सावळे, उद्भवराजे काळे, राजेंद्र चव्हाण, गणेश सोनवणे, सुमित टूमलाईत, सुनील सावंत, इम्रान शेख, सुमित लोहरे आदी उपस्थित होते.
जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उद्‌घाटन बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे सचिव अंकुशरावजी कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रो कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर, औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा स्मारक नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष नवल किशोर राम, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा श्रीमती रेखा चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमस्थळी प्रसिद्ध शाहिर सुरेश जाधव यांचे शहाजीराजांच्या जीवन चरित्रावर पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी, शिवकालीन युद्धनिती आणि विविध हत्यारासहचे प्रात्यक्षित गोरक्षनाथ कुंडलवाल यांचे पथक साजरे करणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा जयंती उत्सव गेल्या पंधरा वर्षापासून अथक परिश्रम घेऊन जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण करीत आहेत.
जयंती महोत्सव कार्यकारिणी जाहीर
सन 2018-19 साठीची जयंती महोत्सव कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी जाहीर केली केली. अध्यक्षपदी विलास पांगारकर, उपाध्यक्षपदी राजेंद्र दाते पाटील, प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, चंद्रकांत भराट, रमेश केरे, रवींद्र काळे, सुरेश वाकडे, सुनील कोटकर, विलास चव्हाण, योगेश केवारे, विवेकानंद बाबर, ज्ञानेश्वर गायकवाड आदींचा समावेश आहे.

...Read More

V. S. News
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज

व्हीएस न्यूज - सत्तास्थान हे लोककल्याणाचा एक मार्ग आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपले काम लोकशाही पध्दतीने चालले आहे कि नाही, याचे कठोर आत्मपरिक्षण नित्य केले पाहिजे, असे लोककल्याणाला मार्गदर्शक ठरणारे विचार यशवंतराव चव्हाण यांचे होते. आज त्यांच्या विचारांचे सर्व सत्ताधाऱ्यांनी चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष साठे यांच्या हस्ते सोमवारी वल्लभनगर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सरचिटणीस सज्जी वर्की, हिरा जाधव, शोभा कोराटे, हुरबानो शेख, इर्शाद शेख, वसंत मोरे, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, किसन भालेकर, सुनिल राऊत, तुषार पाटील, माधव पुरी, श्रीरंग सरपते आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात जन्मलेले यशवंतराव चव्हाण हे उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी, अभ्यासू व्यक्तीमत्व, रसिक व साहित्यिक होते. युगांतर, सह्याद्रिचे वारे, कृष्णाकाठ, ऋणाबंध हे त्यांचे ग्रंथ आजही महाराष्ट्रातील अभ्यासकांना मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिकी करणाचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी उभारला. आज शेती आणि उद्योगात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे यांचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांचे आहे.

...Read More

V. S. News
डेक्कन एक्सप्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

व्हीएस न्यूज - मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस गाडीच्या धकडेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडला.
अपघातात ठार झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. तरुणाने अंगावर निळ्या पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. रंगाने सावळा, केस काळे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एक 25 वर्षीय तरुण आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. मुंबईवरून पुण्याकडे जात असलेल्या डेक्कन एक्सप्रेसची धडक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!