व्हीएस न्यूज - महाराष्ट्र शासन आणि स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 मार्च रोजी शहाजीराजे भोसले यांची 424 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खा. संभाजीराजे भोसले (कोल्हापूर घराणे), प्रिन्स ऑफ तंजावर म्हणजे तंजावर घराण्याचे राजे शिवाजीराजे भोसले आणि नागपूर घराण्याचे राजे राजे मुधोजी भोसले या राजघराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली वेरुळ येथे हा सोहळा संपन्न होत आहे, अशी माहिती शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विलास पांगारकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन गावंडे, शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजू सावळे, उद्भवराजे काळे, राजेंद्र चव्हाण, गणेश सोनवणे, सुमित टूमलाईत, सुनील सावंत, इम्रान शेख, सुमित लोहरे आदी उपस्थित होते.
जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे सचिव अंकुशरावजी कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रो कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर, औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा स्मारक नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष नवल किशोर राम, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा श्रीमती रेखा चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमस्थळी प्रसिद्ध शाहिर सुरेश जाधव यांचे शहाजीराजांच्या जीवन चरित्रावर पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी, शिवकालीन युद्धनिती आणि विविध हत्यारासहचे प्रात्यक्षित गोरक्षनाथ कुंडलवाल यांचे पथक साजरे करणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा जयंती उत्सव गेल्या पंधरा वर्षापासून अथक परिश्रम घेऊन जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण करीत आहेत.
जयंती महोत्सव कार्यकारिणी जाहीर
सन 2018-19 साठीची जयंती महोत्सव कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी जाहीर केली केली. अध्यक्षपदी विलास पांगारकर, उपाध्यक्षपदी राजेंद्र दाते पाटील, प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, चंद्रकांत भराट, रमेश केरे, रवींद्र काळे, सुरेश वाकडे, सुनील कोटकर, विलास चव्हाण, योगेश केवारे, विवेकानंद बाबर, ज्ञानेश्वर गायकवाड आदींचा समावेश आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002