व्हीएस न्यूज - मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस गाडीच्या धकडेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडला.
अपघातात ठार झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. तरुणाने अंगावर निळ्या पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. रंगाने सावळा, केस काळे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एक 25 वर्षीय तरुण आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. मुंबईवरून पुण्याकडे जात असलेल्या डेक्कन एक्सप्रेसची धडक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस अधिक तपास करत आहेत.