व्हीएस न्यूज - दरवर्षीप्रमाणे डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी येथे दृष्टी 2018 हा वार्षीक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुगे हवेत सोडून करण्यात आले. विदयार्थ्यांनी त्यांच्यातील विविध कलागुणांचे दर्शन या कार्यक्रमात उपस्थितांना घडवून आणले. गायन, विविध सांस्कृतीक तसेच पाश्चात्य नृत्यप्रकार, विविध नाटयप्रसंग या ठिकाणी विदयार्थ्यांनी सादर केले. तृतीय वर्षे बी.फार्मच्या मुलांनी सोशल ईलनेसफ या विषयावर सादर केलेला फॅशनशो कार्यक्रमाचे प्रमुख आर्कषण ठरला.तसेच द्वितीय वर्षे बी.फार्म मुलींनी सादर केलेल्या फॅशनशो च्या माध्यमातून त्यांनी स्त्री सुरक्षेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले.
आधुनिकतेने भरलेल्या या कार्यक्रमात वैभव दाणी या विदयार्थ्याचा मराठी अभंग तसेच अभिलाषा हर्णे या विदयार्थीनीने प्रस्तुत केलेली शिवस्तुती आपली वेगळीच छाप सोडून गेली. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अंतीम वर्षातील विदयार्थ्यांनी प्राचार्य डॉ.निरज व्यवहारे तसेच महाविदयालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मुकेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. अभिषेक स्वामी याने आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002