व्हीएस न्यूज – येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स ऍण्ड रिसर्च आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये “जैवपदार्थांचा प्रतियौगी औषधांमध्ये करण्यात येणारा वापर आणि जैवपदार्थामधील विविध संशोधनात्मक संधी’ यावर माहिती देण्यात आली.
परिषदेचे उद्घाटनाच्या वेळी राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळा पुणेचे वरिष्ठ संशोधक डॉ. पंकज पोतदार, प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, समन्वयक डॉ. आशा थॉमस आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. पोतदार यांनी “मल्टिफंक्शनल प्लाटफोर्मास फॉर मल्टिमोडेल एमेजिंग, बायोसेन्सर डिटेशन, ड्रग डिलेव्हरी आणि रिव्हर्सल ऑफ न्युरोडिजनरेशन’ या विषयाखाली मार्गदर्शन केले.
यानंतर आगरकर इन्स्टिट्यूट ऑफ पुणेच्या डॉ. रिंकू उमराणी यांनी “नॅनोमटेरिअल फॉर पॅनक्रियाटिक बिटा सेल रिजरेशन – थेरपी फॉर डायबेटीस’ यावर ओर्थोक्राफ्ट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. पियुष जोशी यांनी “पोलिमेरिक बायोमटेरियल आणि सायन्स इंटरप्रेनरशिप’ या विषयावर मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये संशोधक पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी गटातून शाहरूख खान (प्रथम), निखिल लोहे (द्वितीय), रूपाली हंडाल, पूनम पेटकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. शेजल गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रितेश भोळे यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002