व्हीएस न्यूज - श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील राजगुरव कॉलनीमधील श्री गणेश मंदिर प्रांगणात आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते उद्या (गुरुवार) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक गणेश खांडगे, संतोष शिंदे, नगरसेविका नीता काळोखे, काजल गटे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे आदी उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे 'छत्रपती शिवाजी महाराज' हा विषय मांडतील. शुक्रवारी कीर्तनकार डॉ.जयंत करंदीकर 'सुखी जीवनाची गुरूकिल्ली' या विषयावर तर व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प शनिवारी ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन गुंफणार असून 'अशांत सीमा आणि अस्वस्थ भारत' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले यांनी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002