व्हिएस न्यूज - पतीच्या उपचाराची कागदपत्रे घेवून जाण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलाने रूग्णालयात आरडा-ओरड करून एका महिलेचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी माय लेकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास चिंचवड येथील निरायम रूग्णालयात घडला.
निरायम रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनुज कनवलराज डॅंग (वय-27) व त्याची आई या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिलेच्या पतीने निरामय रूग्णालयात उपचार घेतले होते. त्या उपचाराची कागदपत्रे घेवून जाण्यासाठी महिला व तिचा मुलगा अनुज शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास रूग्णालयात आले होते. उपचाराची कागदपत्रे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मागितली. डॉक्टरांनी कागदपत्रे संबंधित टेबलवरून घेवून जाण्यास सांगितले. टेबलवरील महिलेशी कागदपत्रे घेताना आरोपी महिलेचा व तिच्या मुलाचा वाद झाल्याने दोघांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत आरडा-ओरड केली. फिर्यादी महिलेच्या हातातील मोबाईल घेवून पसार झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002