व्हिएस न्यूज - पायी घरी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 87 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावले. महिलेने प्रतिकार केल्याने अर्धे मंगळसुत्र घेवून चोरटे पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास वाकड पोस्ट कार्यालयाजवळ घडली.
60 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला पती, भावजय व भाऊ यांच्यासह मुंबई येथे जाणाऱ्या गाड्यांचा थांबा बघून पायी घरी जात होती. समोरून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतू, महिलेने प्रतिकार करत मंगळसुत्र पकडून ठेवल्याने अर्धे मंगळसुत्र हिसकावून चोरटे पसार झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. आर. लोंढे अधिक तपास करत आहेत.