व्हिएस न्यूज - मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी दुचाकीवरून जाताना भरधाव वेगातील मोटारीने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पौड रस्त्यावरील वुड्स हॉटेलसमोर शनिवारी पहाटे घडली.
मानस उपाध्याय (वय-18, रा. न्याती एम्पायर खराडी) आणि कुणाल शर्मा (वय-18, रा. विमाननगर, पुणे) अशी मृत्यू झालेल्या तरूणाची नावे आहेत. मोटार चालक दर्शन विजय जमदाडे (वय-25, रा. बावधन) याला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अमरनाथ सिंग राजेशसिंग (वय-18, रा. खराडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमरनाथसिंग, धु्रव बिष्णोई, शुभम मदार, कुणाल शर्मा आणि मानस उपाध्याय हे शनिवारी पहाटे दुचाकीवरून भुगांव येथील कॅफ सीओ-2 या हॉटेलमध्ये जेवनासाठी जात होते. हॉटेल वुड्स समोर भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने धु्रव, मानस आणि शुभम व कुणाल यांच्या दोन्ही दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये कुणाल आणि मानस यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर धु्रव व शुभम हेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मानस, कुणाल, शुभम आणि ध्रुव हे चौघे खराडी परिसरातील एका महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते . आरोपी दर्शन जमदाडे हा भांडारकर रोड येथील एका कंपनीत मार्केटींग हेड म्हणून काम करतो. शुक्रवारी रात्री तो जेवन करून होंडा एकॉर्ड कारने बावधन येथील आपल्या घरी निघाला होता. भरधाव वेगात असलेल्या त्याच्या कारने तीन दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तीनही दुचाकींचा चक्काचुर झाला.
याप्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पगारे करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002