व्हीएस न्यूज - कोल्हापुरला सोडण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी एका प्रवाशाला मोटारीत बसवून दमदाटी करत त्याच्याकडील रोख 1 हजार, मोबाईल असा 11 हजार रूपयांचा ऐवज लुबाडूण नेला. हा प्रकार 29 नोव्हेंबर रोजी रात्री तीन वाजता मुंबई-बैंगलोर हायवेवर घडला.
योगेश कुंभार (वय-27, रा. कोल्हापुर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेशला बहिणीच्या लग्नासाठी कोल्हापुर जायचे होते. दोन भामट्यांनी कोल्हापुरला सोडण्याच्या बहाण्याने योगेशला मोटारीत बसविले. दमदाटी करत त्याच्याकडील रोख 1 हजार, एक मोबाईल असा 11 हजार रूपयांचा ऐवज लुबाडूण नेला. योगेश बहिणीच्या लग्नाच्या गडबडीत असल्यामुळे त्याने रविवारी फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.