लग्नाला आलेल्या महिलेचे लाखाचे मंगळसुत्र चोरट्याने हिसकावले
वाकड
2017-12-11
व्हीएस न्यूज - एका नातेवाईकाच्या लग्नाला साताऱ्याहून वाकड येथे आलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल एक लाखांचे मंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावले. ही घटना वाकड येथील मुंजाबानगर, येथे दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.
शोभा आनंद शिंदे (वय-32, रा. आसगाव, ता. जि. सातारा) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार डी. आर. लोंढे यांनी माहिती दिली. शिंदे यांच्या एका नातेवाईकाच्या मुलाचे काळा खडक येथील रघुनंदन मंगल कार्यालय येथे रविवारी दुपारी लग्न होते. त्यासाठी त्या साताऱ्याहून आल्या होत्या. मुंजाबानगर येथून त्या पावणेचारच्या सुमारास पायी जात होत्या. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 1 लाख 5 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून चोरून नेले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.