महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या राज्य परिषदेचा चिंचवडमध्ये समारोप
व्हीएस न्यूज - 'पल्प स्टेमसेल्स'चा वापर ज्या पध्दतीने वैद्यक शास्त्रात होतो. त्याच प्रमाणे 'डेन्टल पल्प स्टेमसेल्स' चा वापर डायबेटीस, न्युरॉलॉजी अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी होऊ शकतो. या उपचार पध्दतीला अद्याप शासनाची मान्यता मिळालेली नाही. आयडीए आणि त्यांच्या संलग्न संस्थांनी या उपचार पध्दतीस मान्यता मिळविण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही डॉ. एस. शंकरनारयणन यांनी व्यक्त केली.
चिंचवड येथे आयोजित केलेल्या इंडियन डेन्टल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या 56 व्या राज्य परिषदेच्या समारोप सत्रात 'टिश्यू इंजिनिअरिंग ॲण्ड सेल बेस थेरपी इन डेन्टिस्ट्री' या विषयावर डॉ. शंकरनारायणन यांची वायसीएम रुग्णालयाचे दंत विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे व डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालयाच्या डॉ. सुप्रिया खेऊर यांनी प्रकट मुलाखत घेतली. डॉ. शंकरनारायणन यांनी दंतवैद्यकीय शास्त्रामध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून नवीन उपचार पध्दती विकसित केली आहे. सामान्यपणे दातांवरील शस्त्रक्रिया करत असताना अजूनही काही पारंपरिक पध्दतींचा वापर केला जातो. ज्या पध्दतीने अन्य वैद्यकीय क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन करून उपचार पध्दतींमध्ये 'मेडी-इंजिनिअरिंग' चा वापर करून अवघड शस्त्रक्रिया कमी वेळेत व कमी खर्चात केल्या जातात. अशाच पध्दतीने दंत वैद्यकीय शास्त्रातील उपचार पध्दतींमध्ये देखील संशोधनाव्दारे नाविन्यपूर्ण कल्पना, उपचार पध्दती विकसित करण्याची गरज असल्याचे डॉ. शंकरनारायणन यांनी स्पष्ट केले.
मनुष्यावर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करताना आवश्यकता असल्यास आपली त्वचा, रक्तपेशी, केस आदींचा वापर केला जातो. दंतवैद्यक शास्त्रामध्ये रुग्णांच्या दातांवर शस्त्रक्रिये वेळी दाताच्या गाभ्यातील पेशी तयार करण्यासाठी'डेन्टल पल्प स्टेमसेल्स'चा वापर करता येऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ दंत वैद्य प्रा. डॉ. एस. शंकरनारायणन यांनी व्यक्त केले. या नव्याने विकसित केलेल्या उपचार पध्दतीस शासनाने लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर माऊली फरांदे, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. मनिष फरांदे, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. संदीप भिरूड, डॉ. निखिल दिवाण, डॉ. जुई तुपे, डॉ. दिपाली पटेकर, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. अमित पाटणकर, डॉ. सचिन कोचेकर आदींसह राज्यभरातून आलेले शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002