व्हीएस न्यूज - बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने शयनगृहातील कपाटीमधील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी मोरवाडीतील लक्ष्मण रेसिडन्सीत उघडकीस आली.
अविनाश सावंत (वय-53, रा. लक्ष्मण रेसिडन्सी, विंग बी, मोरवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांचा शनिवारी सकाळी नऊ ते रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत फ्लॅट कुलूप लावून बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटामधील रोख तीस हजार रूपये, सोन्याचे दागिने असा दोन लाख 35 हजार 855 रूपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच सावंत यांचे शेजारी रामप्रसाद श्रीराम गुप्ता यांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडण्याचे चोरट्याने अयशस्वी प्रयत्न केला. फौजदार जी. एन. कडाळे अधिक तपास करत आहेत.