Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
खासदार संजय काकडे यांची ‘हकालपट्टी’ करा

व्हीएस न्यूज - गुजरात निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळेल, असे अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहेत. मात्र भाजपाचे सहयोगी सदस्य असलेले खासदार संजय काकडे यांनी उलट अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या विधानाने पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून जनमत भाजपाविरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खासदार संजय काकडे यांचे निलंबन करून भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

अमोल थोरात यांनी याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. थोरात यांनी म्हटलयं की, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळेल असे अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहेत. मात्र पुण्यातील भाजपचे सहयोगी सदस्य असलेले खासदार संजय काकडे यांनी या उलट अंदाज वर्तविला आहे. गुजरातमध्ये बहुमत तर सोडा अपक्षांसह अन्य पक्षांची मदत घेऊनही सत्ता स्थापन करता येणार नाही, असे भाकित वर्तविले आहे. संजय काकडे यांच्या या भाकितामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे. यापूर्वीही काकडे यांनी या प्रकारे भाकिते वर्तवून भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले आहेत. येनकेन प्रकारे प्रसिध्दीच्या झोतात राहण्याचा संजय काकडे यांचा सातत्याने प्रयत्न असतो, त्यामुळेच काकडे अशी वादग्रस्त विधाने करतात. काकडे यांच्या या विधानामुळे भाजपची प्रतिमा डागाळत असून, जनमत भाजपविरोधात जाण्याची शक्यता आहे. भाजपचे देशभरात उत्कृष्ट काम सुरू आहे. त्यामुळे भाजपकडे मतदारांचा ओढा आहे. असे असताना संजय काकडे भाजपविरोधी भाकिते वर्तवित आहेत. त्यामुळे संजय काकडे यांचे निलंबन करून भाजपमधून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू - लाल बाबू गुप्ता

व्हीएस न्यूज - दुर्गम भागातील, आदिवासी, वाड्यावस्तीवरील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे. सरकारच्या आरोग्य विषयक सेवा सवलतींचा लाभ शेतक-यांना मिळावा. यासाठी डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन नेहमी पुढाकार घेत असते. त्यांच्या सहयोगाने विश्व श्रीराम सेनेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्य जीवनस्तर उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. असे प्रतिपादन विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष लाल बाबू गुप्ता यांनी केले.

शनिवारी (दि. 16 डिसेंबर) विश्व श्रीराम सेना आणि डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चाकण जवळील पिंपरी बुद्रुक येथे राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी डॉ. मनोज तिवारी, डॉ. दिपक कोलते, पंचायत समिती सदस्य कैलास गाळव, गोसासी गावचे सरपंच नारायण पुरी, विश्व श्रीराम सेना आरोग्य मंचचे अध्यक्ष अक्रम शेख, माजी सरपंच संतोष गोरडे, मच्छींद्र भुजबळ,प्रमोदकुमार गुप्ता, नवनाथ हुंडारे, गणेश वाळूंज, आदित्य कुमार, विवेक भुजबळ आणि डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील स्टाफ आदी उपस्थित होते.

पिंपरी बुद्रुक गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी आणि बहुतांश ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी, ईसीजी, बीएमआय, नेत्र तपासणी, दंत रोग तपासणी,अस्थिरोग, त्वचा रोग आणि स्त्रीयांच्या आजारांची तपासणी करण्यात आली. या शिबीराचा 397 नागरिकांनी लाभ घेतला. या तपासणी शिबीरानंतर 23 रुग्णांना पिंपरीतील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यलयात मंगळवारी पुढील मोफत उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. यासाठी जाण्या - येण्याची व्यवस्था डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे. स्वागत सरपंच नारायण पुरी, सूत्रसंचालन मच्छिंद्र भुजबळ आणि आभार अक्रम शेख यांनी मानले.

...Read More

V. S. News
पिंपरी –चिंचवड शहर अग्रस्थानी नेण्यासाठी सहकार्य करा – सीमा सावळे

व्हीएस न्यूज - शहर स्वच्छ, सुंदर तसेच शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी सर्व महिला भगिनींनी स्वच्छता अभियानात सहभागी होवून केंद्रशासनाने विकसित केलेला स्वच्छता अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून सहकार्य करावे. हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात अग्रमानांकित होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छसर्वेक्षण २०१८ मध्ये नागरिकांचा सहभाग घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यांतर्गत सिमा सावळे यांच्या पुढाकाराने महिला प्रशिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती सिमा सावळे म्हणाल्या, संसाराची गाडी महिला सक्षमपणे पुढे नेतात त्याचप्रमाणे शहर स्वच्छतेची गाडीही पुढे नेण्यासाठी सर्व महिलांनी सहकार्य करावे. आपण जबाबदार नागरिक म्हणून स्वच्छता अॅप डाऊनलोड करावा. त्या माध्यमातून शहरातील स्वच्छता विषयक समस्या महापालिकेकडे पाठवता येतील व त्यावर महापालिका २४ ते ४८ तासात कार्यवाही करेल असेही, त्या यावेळी म्हणाल्या. महिला ज्या ठिकाणी काम करतात त्याही ठिकाणी कचरा पडलेला असतो परंतु सजग नागरिक म्हणून आपण ही बाब महापालिकेच्या लक्षात आणून द्यावी. महापालिकेचे स्वच्छता दूत म्हणून सर्वांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्वच्छता अॅप सर्वाधिक डाऊनलोड करून या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येईल. पिंपरी चिंचवड शहराचा या स्वच्छ सर्वेक्षणातील मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यामध्ये अग्रक्रम आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. व सर्व महिलांच्या प्रयत्नाशिवाय हि मोहीम यशस्वी होणार नाही. या शहरामध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून ते आवाहन पेलण्यासाठी हातात हात घालून काम करू असेही श्रीमती सावळे म्हणाल्या. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्वच्छतेमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक आहे. स्वच्छते बरोबरच डिजिटल साक्षरता महत्वाची असून महिलांनी त्यामध्ये पुढे यायला हवे. ती आजच्या काळाची गरज आहे. गरिबीतून बाहेर येण्यासाठी आरोग्य निरोगी राखणे गरजेचे आहे. गरीब महिलांना त्यांचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी व त्याची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारचा स्वच्छता अॅप महत्वाचा आहे. त्यामुळे कचरा, ड्रेनेज, सह स्वच्छता विषयक तक्रारी घरबसल्या करता येणार आहेत. त्याचे निराकरण महानगरपलिका २४ ते ४८ तासात करणार असून त्यासाठी सर्व महिलांनी आपल्या मोबाईल मध्ये स्वच्छता अॅप डाऊनलोड करवा, असे आवाहनही आयुक्त श्री. हर्डीकर यांनी केले. स्वच्छता अभियान हे शहरातील तळागळापर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्व महिलांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याबाबतची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे म्हणाल्या, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून स्वच्छता विषयक काम करावे. महिलांनी ठरवले तर त्या कोणतेही कार्ये यशस्वी करू शकतात. परिसराप्रमाणे शहर स्वच्छ असायला हवे हि भावना सर्वांमध्ये निर्माण होत आहे. महानगरपलिकेचे कर्मचारी कचरा संकलनासाठी घरोघरी येत आहेत तेव्हा ओला व सुका कचरा वेगेवेगळा करून त्यांना द्यावा व शहर स्वच्छता मोहीमेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

...Read More

V. S. News
पिंपरी वाघेरे ते पिंपळे सौदागर मार्गातील नदीच्या पुलाचे काम लवकरच

व्हीएस न्यूज - पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर मार्गातील नदीवरील नियोजित 12 मीटर समांतर पुलाचे काम लवकरच होणार असल्याची माहिती नगरसेवक संदिप वाघेरे यांनी दिली. या पुलामुळे शहरातून पिंपरी गाव मार्गे पिंपळे गुरव, पिंपळे सौदगर, काटे पिंपळे, पिंपळे निलख, औंध व रावेत या भागात जाणाऱ्या येणाऱ्या लाखों नागरिकांची सोय होणार आहे. यासाठी नगरसेवक संदिप वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे पत्र देऊन पाठपुरावा केला होता. वाघेरे यांच्या पत्राची दखल घेऊन आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता विजय भोजणे, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता गुरव, सर्व्हेअर नाईक यांनी नगरसेवक संदिप वाघेरे यांच्या समवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

...Read More

V. S. News
अहिंसेच्या तत्वाने पुरोगामी विचारांचा वसा राहुल गांधी पुढे नेतील

व्हीएस न्यूज - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारल्यामुळे देशभरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राहुल गांधींपुढे जरी अनेक आव्हाने असली तरी ते अहिंसेच्या तत्वाने पुरोगामी विचारांचा वसा पुढे नेत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठ बळावर पुढील आव्हानांवर मात करतील असा विश्वास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला.

शनिवारी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश सचिव बिंदू तिवारी, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, शहर सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश मागासवर्गिय सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, तुकाराम भोंडवे, राजन नायर, संदेश नवले, आबा खराडे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, चंद्रशेखर जाधव, शोभा कोराटे, मलीना दास, मेहताब इनामदार, दिलीप पांढारकर, पांडूरंग जगताप, किशोर कळसकर, आण्णा कसबे, भास्कर नारखेडे, हिरा जाधव आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रीमंडळाचे सदस्य जन मानसात संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य करुन जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वांचा देशभर प्रचार प्रसार करतील. देशात पुन्हा पुरोगामी विचार वाढवून 2019 ला सत्ता बदल करतील. सोनिया गांधी ज्यावेळी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या त्यावेळी देशातील फक्त तीन राज्यात कॉंग्रेसची सत्ता होती. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर देशातील नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आणि देश कॉंग्रेसमय झाला. तीच परिस्थिती पुढील वर्षात येणार आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांच्या वाढलेला जनसंपर्क व प्रभाव पाहुन हतबल झालेल्या पंतप्रधानांनी 50 जाहीर सभा घेतल्या. तर सर्व केंद्रीय मंत्रीमंडळ आणि देशातील डझनभर मुख्यमंत्री गुजरातमध्ये तळ ठोकून होते. याचाच अर्थ राहुल गांधींचे नेतृत्वाने भाजपाची पायाखालची वाळू सरकली आहे. सोनिया गांधी यांनी निस्सिमपणे देशाची सेवा केली आणि शेवटपर्यंत त्या कॉंग्रेसचे काम करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच देशातील जनता सत्ता बदलाचा आता कौल देईल. असाही विश्वास सचिन साठे यांनी व्यक्त केला.

...Read More

V. S. News
मृतदेह दीड तास रस्त्यावर पडून ,भोसरी पोलिसांचा हद्दीचा वाद

व्हीएस न्यूज - सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांच्या मुजोरीचा अनुभव नित्याचाच भाग झाला आहे. याचीच प्रचिती म्हणजेच भोसरीतील रविवार घडलेल्या अपघातातील मृतदेह जो तब्बल दीड तास जागीच पडून होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नेहरुनगरवरुन लांडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंडीत अॅटो समोर रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मयत इसम त्याच्या मुलासह दुचाकीवरुन जात होता. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता तर वडीलांच्या मांडीवरती पोते होते. गाडीवरुन पोते खाली पडले मात्र गाडी तशीच पुढे गेली. हे समजताच मुलाने गाडी थांबवली व वडील पोते घेण्यासाठी खाली उतरले. यावेळी समोरुन येणाऱ्या ट्रकची धडक बसली आणि मागचे चाक संबंधीत इसमाच्या डोक्यावरुन गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मात्र,पोलीस मदत आणि रुग्णवाहीका न येवू शकल्याने मयत इसमचा मृतदेह दुपारी एक वाजेपर्यंत रस्त्यावरच पडून होता.अखेर नागरीकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून फोन गेल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी एक तासानंतर घटनास्थळी आले. या घडलेल्या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हातओले करणाऱ्या कामात कार्यतत्परता दाखवणाऱ्या पोलिसांनी अशा घटनेकडे दुर्लक्ष केल्याने सर्व थरातून टीका होत आहे.
...Read More

V. S. News
विकासकामांसाठी​ शंभर टक्के कृत्रिम वाळूचा वापर

व्हिएस न्यूज - नैसर्गिक वाळूचा तुटवडा असल्याने आणि बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाळू वापराबाबतचे नवीन धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार या विभागाकडून करण्यात येणारे रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींसाठी आता शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जाणार आहे. ही वाळू चांगल्या प्रतीच्या खाणीचा दगड भरडून तयार केलेली असणार असून, प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतरच कृत्रिम वाळू वापरण्यात येणार आहे.

कृत्रिम वाळूचा वापर करण्यापूर्वी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संबंधित वाळू ही चांगल्या प्रतीचा खाणीचा दगड भरडून तयार केलेली असावी, ही अट आहे. त्या वाळूचा वापर करण्यापूर्वी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी केल्यानंतरच कृत्रिम वाळूचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या वाळूचा वापर करताना आवश्यक त्या चाचण्या सरकारी प्रयोगशाळेतून कराव्या लागणार आहेत. सध्या काम सुरू असलेल्या ठिकाणी कृत्रिम वाळू वापरण्यापूर्वी तांत्रिक अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृत्रिम वाळूच्या वापरामुळे आरसीसी बांधकामात जास्त सिमेंट लागल्यास त्याचा अतिरिक्त मोबदला कंत्राटदाराला देण्यात येणार नसल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या नैसर्गिक वाळूची वाढती मागणी आणि उपलब्ध वाळू याचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे बेकायदा वाळू उपसा होऊन नदी आणि नाल्यांच्या प्रवाहात बाधा येते. बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी आणि कृत्रिम वाळूचा वापर वाढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार आता या विभागाकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी​ शंभर टक्के कृत्रिम वाळूचा वापर केला जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक या विभागाकडून काढण्यात आले आहे.
...Read More

V. S. News
वार्ताहर मारहाण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा- नीलम गो-हे

व्हीएस न्यूज - सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी मुजोरपणाने विनाकारण वार्ताहराला मारहाण करून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतल्याबाबतच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी केली आहे. याबाबतच्या मागणीचे निवेदन त्यांनी आज पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या लोकसत्ताचे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी शनिवारी मारहाण केली होती. यावेळी शासकीय अधिकारी प्रसाद आयुष यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले असता आयुष यांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणी करून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर आयुष तेथून निघून जात असताना भुकेले यांनी आंदोलनाशी संबंधित काही प्रश्न आयुष यांना विचारले आणि उत्तराचे त्यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले.

आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे हे भुकेले यांच्याकडे आले. ‘तू मोबाइलवर रेकॉर्डिंग का करतो’ अशी दमबाजी त्यांनी केली. वार्ताहर असल्याचे मोरे यांना ओळखपत्रही दाखविले. भुकेले यांनी मोबाइलवर केलेले रेकॉर्डिंग काढून टाकण्याची मागणी आयुष यांनी केली. भुकेले यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर मोरे यांचा पारा चढला. त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी भुकेले यांना ओढून नेत थेट पोलीस व्हॅनमध्ये बसविले.

पोलीस व्हॅनमध्येच भुकेले यांना मारहाण केली. त्यानंतर एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन भुकेले यांना थेट हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेण्यात आला. ही घटना गंभीर असल्याने याबाबत मोरे यांची चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. नीलम गो-हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यांनी याबाबत माहिती दिली असून या घटनेचा पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. पत्रकारांना सौहार्दपूर्ण वागणूक देण्याबाबतच्या सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात याव्यात असेही या निवेदनात म्हटले आहे.
...Read More

V. S. News
'राहुल गांधींमुळे युवकांमध्ये नवचैतन्य'

व्हिएस न्यूज - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारल्यामुळे देशभरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राहुल गांधींपुढे जरी अनेक आव्हाने असली तरी ते अहिंसेच्या तत्वाने पुरोगामी विचारांचा वसा पुढे नेत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठ बळावर पुढील आव्हानांवर मात करतील असा विश्वास कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला.
शनिवारी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारला. त्यानिमित्त शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश सचिव बिंदू तिवारी, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, शहर सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, राजेंद्रसिंह वालिया, नरेंद्र बनसोडे, विशाल कसबे, मयूर जैयस्वाल, शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, तुकाराम भोंडवे, राजन नायर, संदेश नवले, आबा खराडे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, चंद्रशेखर जाधव, शोभा कोराटे, मलीना दास, मेहताब इनामदार, दिलीप पांढारकर, पांडूरंग जगताप, किशोर कळसकर, आण्णा कसबे, भास्कर नारखेडे, हिरा जाधव आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रीमंडळाचे सदस्य जन मानसात संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य करुन जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वांचा देशभर प्रचार प्रसार करतील. देशात पुन्हा पुरोगामी विचार वाढवून 2019 ला सत्ता बदल करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
...Read More

V. S. News
पिंपरी- चिंचवड शहरातील विविध प्रश्नासंबंधी पालकमंत्री घेणार नागपुरात बैठक

व्हिएस न्यूज- पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेणे, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणणे, पवना बंदिस्त जलवहिणी प्रकल्प मार्गी लावणे, शास्तीकर, रिंगरोड आदी शहरातील प्रश्नासंबंधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट नागपुर येथे पिंपरीतील पदाधिकाऱ्यांसमवेत येत्या दोन दिवसांत बैठक घेणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन पिंपरी महापालिकेत भाजपाने सत्ता काबिज केली. मात्र, दहा महिने झाल्यानंतर एकही महत्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्य़ाची शहरवासियांकडून जोरदार मागणी होत आहे. यासह आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणणे, पवना बंदिस्त जलवहिणी प्रकल्प मार्गी लावणे, शास्तीकर, रिंगरोड आदी शहरातील महत्वाच्या प्रश्नासंबंधी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या समवेत य़ेत्या दोन दिवसात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून चर्चा करणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री बापट यांच्या नेतृत्वाखाली महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हिवाळी अधिवेशनात शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत.
...Read More

V. S. News
भाजप नेत्यांच्या वरदहस्तामुळेच सांगवी परिसरात अनधिकृत बांधकामे बोकाळली

व्हिएस न्यूज - भारतीय जनता पक्षाचे नेते, नगरसेवक यांच्या वरदहस्ताने सांगवी, पिंपळे-गुरव परिसरात बांधकाम व्यावसायिक नदी पात्र, शेती झोनमध्ये राजरोसपणे अनधिकृत बांधकामे करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला आहे. याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारने 2015 पुर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यासाठी नागरिकांकडून अर्जही स्विकारले जात आहेत. परंतु, सांगवी, पिंपळे-गुरव परिसरात भाजपचे नेते, नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांचा वरदहस्तामुळे सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिकांकडून नदी पात्र, शेती झोनसह वाढीव अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. या सर्व अनधिकृत बांधकामाची आकारणी सांगवी करसंकलन विभागात कार्यालयीन वेळेआधी, कार्यालयीन वेळेनंतर व शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरू आहे.
बांधकाम आकारणी, हस्तांतर करणे, मिळकत उतारा देणे, 600 चौरस फुटाच्या आत बांधकामाची आकारणी करण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतात. दिले नाही तर तुमचे बांधकाम जमीनदोस्त करू, अशी धमकी देत वरिष्ठ लिपिक, लिपिक तसेच शिपाई सुध्दा पैशांची मागणी करत असल्याचा आरोप जगताप यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच सांगवी करसंकलन विभागातील करआकारणी लिपिकांची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी जगताप यांनी केली आहे.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!