पुणे महापालिकेच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन
पुणे
2017-12-18
व्हीएसन्यूज -पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना झोपेतच ह्रदयविकाराचा झटका आल्याचे निकटवर्तीयांकडून समजते. त्यांना खराडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोद्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपद भूषवले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये त्या महापौर झाल्या होत्या. त्यांच्या या आकस्मित निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.