Breaking News

'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... |
V. S. News
जेटच्या मुंबई - दिल्ली विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

व्हीएस न्यूज - सुरक्षेच्या कारणास्तव जेट एअरवेजच्या मुंबईवरुन दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानातील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले असून बॉम्बशोधक आणि सुरक्षा दलाचे पथक विमानाची तपासणी करत आहे.

विमानातून ११५ प्रवाशांसह ७ क्रू मेंबर्स प्रवास करत होते. जेट एअरवेजने ट्विटरवरुन प्रसिध्दपत्रक जारी केले आहे. त्यात इमर्जन्सी लँडिंगबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणेला संपुर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे. तसेच प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

...Read More

V. S. News
राम जन्मभूमी वादाचा तिढा सुटला असता, पवारांचा गौप्यस्फोट

व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्या राम जन्मभूमी वादावर एका मुलाखतीदरम्यान महत्वाचा खुलासा केला आहे. राम मंदिराचा तिढा चंद्रशेखर सरकारच्या काळात सुटण्याच्या मार्गावर होता. मात्र, काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळल्याने हा प्रश्न मागे पडला असे पवार यांनी सांगितले.

अयोध्या राम जन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एक समिती गठीत केली होती. या समितीत शरद पवार यांच्यासह राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांचा समावेश होता. या दोघांवर दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या चर्चेदरम्यान मंदिराकरता ६०-६५ टक्के तर मशिदीकरता ३५-४० टक्के जागा देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली होती. हा वाद जवळपास सुटण्याच्या मार्गावर होता. दरम्यान, याच काळात केंद्रात राजकीय अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली. काँग्रेसने चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळले. त्यामुळे अयोध्या राम जन्मभूमी वादाचा प्रश्न मागे पडला.

डिसेंबरमध्ये होणार अंतिम सुनावणी-

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात या वादासंदर्भातील याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू होणार आहे. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी अयोध्या रामजन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.

...Read More

V. S. News
भाजपाचा पराभव शक्य – अशोक चव्हाण

व्हीएस न्यूज - २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजपला एकूण मतदानापैकी ३१ टक्के मते मिळाली होती. याचाच अर्थ ६९ टक्के मतदान भाजपच्या विरोधात विखुरले गेले होते. हेच मतदान विरोधकांना संयुक्तपणे झाल्यास भाजपचा पराभव शक्य आहे, असा सूर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी लावला.

भाजप सरकारच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या पुढाकाराने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जनता दलाचे शरद यादव, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, काँग्रेसचे आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर,राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश यादव, खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते.

‘हम’ म्हणजे हिंदूू-मुस्लीम एकी. पण अलीकडच्या काळात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न भाजप सरकारकडून सुरू झाल्याची टीका सीताराम येचुरी यांनी केली. ताजमहालसंदर्भात देशात कधीही वाद झाला नव्हता. जगातील हे सातवे आश्चर्य आहे. आता भाजप सरकारने ताजमहालच्या विरोधातही वाद उकरून काढल्याचा आरोप शरद यादव यांनी केला.

वस्तू आणि सेवा कर तसेच नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला. वस्तू आणि सेवा करामुळे महागाईत वाढ झाली, अशी टीकाही सर्व विरोधी नेत्यांनी केली.

...Read More

V. S. News
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रूग्णालयात दाखल

व्हीएस न्यूज - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती गंगाराम रूग्णालयाचे चेअरमन डॉक्टर डी. डीएस राणा यांनी दिली. काही दिवसांपूर्वीही सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्याचमुळे दिवाळीनंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा उपाध्यक्ष राहुल गांधींच्या खांद्यावर दिली जाईल अशी चर्चा होती. अद्याप असा कोणताही निर्णय पक्षाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र शुक्रवारी त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. ‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी शिमला या ठिकाणी सुट्टीसाठी गेल्या होत्या. शिमल्यामध्ये प्रियंका गांधी यांचे घर बांधण्यात येते आहे. या बांधकामाची पाहणीही त्यांनी केली. तसेच तिथे त्या ‘वाईल्ड फ्लॉवर’ या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. मात्र त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला आणि त्यांना दिल्लीत आणावे लागले. दिल्लीत आणल्यावर त्यांना सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले. सोनिया गांधी यांना प्रकृती चांगली नसण्याचा त्रास जाणवतो आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर अमेरिकेतही उपचार करण्यात आले होते.

...Read More

V. S. News
भारतीय दत्तक मुलीची अमेरिकेत हत्या ; चौकशीचे आदेश

व्हीएस न्यूज - तीन वर्षीय अनाथ भारतीय मुलीला दत्तक घेतल्यानंतर तिची अमेरिकेत पालक पित्याकडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कसून चौकशी आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी महिला व बालविकास मंत्रालयाला दिले आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, आता यापुढे परदेशातील नागरिकांनी भारतातून दत्तक घेतलेल्या मुलांचे पासपोर्ट हे महिला व बालविकास मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच दिले जातील, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. अमेरिकेतील टेक्सास येथे भारतातून दत्तक घेतलेल्या शेरिन मॅथ्यूज या तीन वर्षाच्या मुलीची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

शेरिनला तिच्या अमेरिकन पालकांनी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ‘मदर तेरेसा अनाथ सेवा आश्रमा’तून दत्तक घेतले होते. दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिच्या या अमेरिकन पालकांनी तिला अमेरिकेतील टेक्सास येथे आपल्या घरी नेले. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी शेरिन डल्लास येथून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पालक पिता वेस्ली मॅथ्यूज याने पोलिसांत दिली होती. सुरुवातीला वेस्ली याने पोलिसांना तक्रार देताना सांगितले होते की, झोपण्यापूर्वी दूध प्यायला नकार दिल्याने त्याने शेरिनला रात्री ३ वाजता घराबाहेर उभे राहण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर त्यांच्या घरापासून जवळच शेरिनचा मृतदेह आढळून आला होता.

मात्र, त्यानंतर वेस्ली मॅथ्यूजने पोलिसांना वेगळीच कथा ऐकवली. शेरिनचा मृतदेह मला आमच्या गॅरेजमध्ये सापडला असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात शेरिनच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी वेस्लीला मुलीला गंभीर दूखापत केल्याप्रकरणी अटक केली होती. यावरुन शेरिनला मारहाण केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्यानंतर ही बाब भारत सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शेरिनच्या दत्तकत्वाची कसून चौकशी करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्रालयाला दिले आहेत.

...Read More

V. S. News
ताजमहालनजीकचे वाहनतळ पाडण्याच्या आदेशास स्थगिती

व्हीएस न्यूज - ताजमहाल परिसरातील बहुस्तरीय मोटार पार्किंग पाडून टाकण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आग्रा येथे ताजमहाल नजीक हे पार्किंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला असून हे पार्किंग सतराव्या शतकातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या ताजमहालच्या पूर्व दरवाजापासून एक कि.मी. अंतरावर आहे. या पार्किंगचे पुढील बांधकाम मात्र थांबवण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे.

न्या. एम.बी.लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांनी अतिरिक्त सरकारी वकील तुषार मेहता यांना सांगितले, की ताज ट्रॅपिझियम झोन व आजूबाजूच्या भागांच्या संरक्षणाबाबतचे सर्वसमावेशक धोरण नेमके काय आहे ते उत्तर प्रदेश सरकारने सांगावे. ताज ट्रॅपिझियम झोन हा ताजमहाल भोवतीचा १०४०० चौरस किमीचा परिसर असून तो ऐतिहासिक ताजमहालचे रक्षण करण्यासाठी आहे. मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, की ताज महालचे रक्षण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. याबाबतचे सर्वंकष धोरण न्यायालयाला सादर करण्यात येईल. न्यायालयाने याप्रकरणी आता पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबरला बहुमजली मोटार पार्किग पाडून टाकण्याचा आदेश दिला होता.

पर्यावरणतज्ज्ञ एम.सी.मेहता यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. ताज महालचे संरक्षण व विकास कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातले आहे. मेहता यांनी याचिकेत म्हटले आहेत की, ताजमहालचे विषारी वायू व जंगलतोडीपासून संरक्षण करावे. ताजमहालच्या रक्षणासाठी न्यायालयाने काही उपाययोजनाही जाहीर केल्या होत्या.

...Read More

V. S. News
मग…‘राष्ट्रगीतासाठी उभे राहायला काय होते’

व्हीएस न्यूज - एखाद्या क्लबच्या बाहेर २० मिनिटे वाट पाहत उभे राहू शकतो, आवडत्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी अर्धा तास रांगेत उभे राहू शकतो. मग, ५२ सेकंदांच्या राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय कठीण आहे, असा सवाल भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहायचे की नाही, या मुद्द्यावरून देशभरात वाद निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभे राहण्याची गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादात अनेक सेलिब्रिटींनी उडी घेतली असून त्यांच्यामध्ये दोन तट पडले आहेत. अभिनेता कमल हसन यांनी सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजवण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. देशभक्ती दाखवण्यासाठी कोणावरही दबाव आणणे किंवा त्यांच्या राष्ट्रभक्तीची परीक्षा घेणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले होते. तर अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान यांनी मात्र राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ थोडावेळ उभे राहण्यास काहीही हरकत नसल्याचे मत व्यक्त केले होते. एकुणच सध्या बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रात याविषयी परस्परविरोधी मतं ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारला राष्ट्रगीत वाजवण्यासंबंधी नियम बदलायचे असतील तर ध्वजसंहिता बदलण्याचा विचार करावा, न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम साधू नये, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...Read More

V. S. News
आधार कार्ड नसलेल्यांना रास्त धान्य योजनेचे फायदे न नाकारण्याचे निर्देश

व्हीएस न्यूज – रास्त धान्य योजनेच्या ज्या लाभार्थ्यांजवळ आधार कार्ड नाही, किंवा ज्यांनी त्यांचे रेशन कार्ड आधार क्रमांकाशी जोडलेले नाही अशा लाभार्थ्यांना या योजनेचे फायदे नाकारू नयेत, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या असून, या सूचनांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

आधार कार्ड नसणाऱ्यांची नावे रास्त धान्य योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून वगळू नये, असेही राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे. रेशन कार्ड आधार कार्डला जोडलेले नसल्यामुळे रास्त धान्य दुकानातून धान्य नाकारण्यात आल्यामुळे झारखंडमधील ११ वर्षे वयाची एक मुलगी कथितरीत्या उपासमारीने मरण पावली होती. या घटनेनंतर या संदर्भातील सूचना गेल्या आठवडय़ात सर्व राज्य सरकारांना जारी करण्यात आल्या आहेत.

एखाद्या रेशन कार्डमधील लाभार्थ्यांची नोद चुकीची आहे ही बाब ‘संशयातितरीत्या’ सिद्ध झाली, तरच लाभार्थ्यांचे नाव रेशन कार्डच्या डेटाबेसमधून वगळले जाऊ शकते, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात स्पष्ट केले आहे. मात्र, आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून लाभार्थ्यांना परत पाठवू नये आणि याबाबतचे सर्व अपवाद एका वेगळ्या पुस्तिकेत नोंदवावेत, असेही राज्यांतील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. आधार कार्ड नसणे, ते जोडलेले नसणे किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरणात येणारी तांत्रिक अडचण यामुळे कुणालाही अन्नधान्य नाकारले जाऊ नये हे निश्चित करणे हा या सूचनांचा हेतू असल्याचे ‘आधार’ क्रमांक जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूएडीएआय)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
‘राज्यात फडणवीस नव्हे, तर फसणवीस सरकार’

व्हीएस न्यूज – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी ही ऐतिहासिक कर्जमाफी असल्याचा डंका पिटला. पण सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या नावाखाली सावळा गोंधळ घातला असून जाचक अटी व शर्ती घालून अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले त्यांच्या खात्यात ही पैसे जमा झाले नाहीत. त्यावरून राज्यात फडणवीस नाही, तर फसणवीस सरकार असल्याचे सिध्द झाले आहे,अशी टिका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अशोक चव्हाण यांनी कर्जमाफीच्या मुद्दयावरून सरकारवर जोरदार टीका केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील 23 शेतक-यांना पालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. मात्र, ज्या शेतक-यांना प्रमाणपत्र वाटली त्यांचे नाव यादीत नसल्याने सरकारवर यादी मागे घेण्याची नामुष्की ओढावली.

उस्मानाबाद तालुक्‍यातील बावी येथील शेतकरी भारत तांबे यांनी 1 लाख 40 हजार रुपयांच्या कर्जमाफीसाठी अर्ज केलेला असताना त्यांना केवळ 10 हजार रुपयाचे कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आले होते. या शेतक-याने सहायक निबंधक आणि जिल्हाधिका-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र परत केले आहे. सुरुवातीपासून राज्य सरकार जनतेची दिशाभूल करित आहे. मोठमोठ्या आकड्यांचे खेळ मांडत आहे. पण शेतक-यांचे हात रिकामे राहिले आहेत. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक करून कर्जमाफी ही शेतकरी सन्मान योजना नाही तर शेतकरी अपमान योजना सिध्द केली आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

कर्जमाफीच्या संदर्भात शासनाची भूमिका पाहता या सरकारला शेतक-यांबद्दल आस्था, संवेदनशिलता नाही हे स्पष्ट झाले आहेच, परंतु या सरकारने जो सावळा गोंधळ मांडून ठेवलेला आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अडचणीत आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 55 लाख शेतकरी कुटुंबानी कर्जमाफीकरिता अर्ज केले असून एकूण 77 लाख शेतक-यांनी अर्ज केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 89 लाख शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे सांगितले होते. मग 12 लाख शेतक-यांचा आकडा कमी कसा झाला? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.

आधार कार्डाची सक्ती ही अनेक शेतकऱ्यांच्या अर्ज न भरता येण्याला कारण झाली आहे. अनेक शेतकरी विहित मुदतीत अर्ज भरू शकले नाहीत. आधार कार्डाच्या सक्तीची प्रक्रिया ही शासनाची होती, बॅंकांची नव्हती. त्यामुळे याला सरकारच जबाबदार आहे. मत्यव्यवसाय करणा-या शेतक-यांनाही सरकारने वगळले आहे, सरकारने जाचक अटी घालून जास्तीत जास्त शेतक-यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवले आहे असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कर्जमाफीच्या यादीत अनेक बोगस नावे आल्याचे सरकारमंत्री मंत्री म्हणत आहेत. तर या संपूर्ण प्रकाराची न्यायालयीन चौकशी करा. तर राज्याच्या इतिहासात कुठल्याही सरकारने शेतक-यांना एवढी अपमानास्पद वागणूक दिली नव्हती अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

ऑनलाईन नोंदणीची अट मागे घ्यावी

कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जाचा गोंधळ अद्याप संपला नसताना सरकारने कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्यालाही आधार कार्ड जोडावे लागणार आहे. सरकारने ऑनलाईन नोंदणीची ही अट तात्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारला दिला आहे.

...Read More

V. S. News
स्टार हेल्थ कडून कर्करुग्णांसाठी ५ लाखाची पॉलिसी

व्हीएस न्यूज – - स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स या कंपनीने, कर्करोगाचे निदान झालेल्या व्यक्तीसाठी स्टार कॅन्सर केअर गोल्ड या आरोग्य विम्याची सुरुवात केली. स्टार कॅन्सर केअर गोल्डतर्फे 5 महिन्याच्या बालकापासून 65वयोगटातील व्यक्तीस 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा कवच दिले जाते. हे कवच आजाराच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी दिले जाते.

या योजनेअंतर्गत आजाराची पुनरावृत्ती झाल्यास, आजार बळावल्यास आणि दुसऱ्यांदा आजार बळावल्यास सुरक्षा कवच दिले जाते. यात नियमित कर्करोगाशी संबंधित नसलेल्या इतर आजारांच्या हॉस्पिटायझेशन खर्चही समाविष्ट आहे. पॉलिसी खऱेदी करण्यासाठी कुठल्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही. कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व्ही. जगन्नाथन्‌ म्हणाले की, आरोग्य विमा ही मूलभूत गरज आहे. हे लक्षात घेता, आम्ही सातत्याने लोकांसाठी जास्तीत जास्त चांगले असेल अशी काही उत्पादने सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. स्टार कॅन्सर केअर गोल्डमध्ये कर्करोग झालेल्या व्यक्तींना कर्करोगाशी संबंधित नसलेल्या इतर आजारांसाठीही सुरक्षा कवच प्राप्त होते.

...Read More

V. S. News
बेभान होऊन काम करा- जयवंतराव ठाकरे

व्हीएस न्यूज - आगामी विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा, यश तुमचेच आहे" असे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे यांनी केले. साक्री येथील राजे लॉन्स मंगल कार्यालयात प्रा. संदीप बेडसे मित्र परिवारातर्फे आयोजित शिक्षक व संस्थाचालकांच्या दीपावली स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. 'टीडीएफ'चे ज्येष्ठ नेते वि. मा. भामरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, प्रा. संदीप बेडसे, 'टीडीएफ'चे ज्येष्ठ नेते बी. एस. पाटील, डी. जे. मराठे, संजय पवार, जे. एम. भामरे, प्रकाश सोनवणे, एस. के. चौधरी, विजय बोरसे, पोपटराव सोनवणे, प्रभाकर बच्छाव, उत्तमराव देसले, ऍड. गजेंद्र भोसले, सयाजी अहिरराव, सरपंच संजय खैरनार, डॉ. एन. डी. नांद्रे, डॉ. राजेंद्र अहिरे, डॉ. अजिंक्य देसले, माजी प्राचार्य एस. एन. खैरनार, दीपक बेडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर ज्ञानेश्वर नागरे, विलास बिरारीस, सुरेश सोनवणे, हर्षवर्धन दहिते, उत्पल नांद्रे, प्रदीप नांद्रे, जितेंद्र मराठे,पंडित बेडसे, सचिन बेडसे आदींचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते म्हणाले की, मागील विधानसभेच्या निवडणुकीत आपण प्रा. संदीप बेडसे यांना मदत करू शकलो नाहीत पण यावेळेस पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.

ज्येष्ठ नेते बी. एस. पाटील म्हणाले की, संदीप बेडसे यांच्यात जरी निवडून येण्याची क्षमता असली तरी गाफील राहून चालणार नाही. 'टीडीएफ'तर्फे उमेदवारीचे संदीप बेडसे हे प्रबळ दावेदार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीत महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात 'टीडीएफ'तर्फे उमेदवारी निश्चितच प्रा.संदीप बेडसे यांनाच मिळेल यात काडीमात्र शंका नाही असेही ते म्हणाले.

मतदारांना भावनिक आवाहन...

प्रा. संदीप बेडसे यांचे वडील स्व. त्र्यंबकराव बेडसे यांनी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षे 'टीडीएफ'चे कार्य केले आहे. परंतु त्यांना आमदारकीची संधी मिळाली नाही. प्रा. संदीप बेडसे यांच्या रूपाने दुसऱ्या पिढीला ती संधी देणे आवश्यक आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे भावनिक आवाहनही यावेळी वि.मा.भामरे यांनी केले.

शेवटी बोलताना प्रा.संदीप बेडसे म्हणाले की, राजकारण नव्हे तर समाजकारण हा आपला मूळ पिंड आहे. केवळ समाजसेवा करण्यासाठीच लठ्ठ पगाराची सरकारी नोकरी सोडून मी गावाकडे आलो आहे. विद्यार्थी, पालक, संस्थाचालक आणि शिक्षकांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे. आपले पाठबळ राहिले तर तेही अशक्य नाही असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी आमदार अमरीशभाई पटेल, रोहिदास पाटील, राजवर्धन कदमबांडे, चंद्रकांत रघुवंशी, जयवंतराव ठाकरे, शिवाजी दहिते, पोपटराव सोनवणे, सुरेश पाटील आदींसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व नगर ह्या पाचही जिल्ह्यांतील शिक्षक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आपल्याला भक्कम पाठबळ असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जे. यू. ठाकरे, शिवाजी दहिते, वि. मा. भामरे, प्रा.संदीप बेडसे, प्रा.दीपक बेडसे, प्रा.भगवान जगदाळे, पंडित बेडसे, जितेंद्र मराठे, डी. जे. मराठे, ऍड.गजेंद्र भोसले, पोपटराव सोनवणे, एस. के. चौधरी, प्रकाश सोनवणे, डॉ.एन.डी.नांद्रे, सरपंच संजय खैरनार आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी प्राचार्य एस. एन. खैरनार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. नरेंद्र तोरवणे यांनी आभार मानले. मेळाव्यास साक्री तालुक्यातील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. संदीप बेडसे यांच्या मित्र परिवाराने शिक्षक स्नेहमीलन मेळाव्याचे आयोजन केले होते.

...Read More

V. S. News
राज्यपालांकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी

व्हीएस न्यूज - मुंबई विद्यापीठातील "ऑनस्क्रीन ऍसेसमेंट'चा गोंधळ व त्यातून निकालांना झालेला उशीर यामुळे वादग्रस्त ठरलेले कुलगुरू संजय देशमुख यांना राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी पदावरून दूर केले.

या गोंधळामुळेच देशमुख यांना सुमारे दोन महिन्यांपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तरीही देशमुख यांनी पद सोडण्याची तयारी दाखवली नव्हती व प्रसंगी न्यायालयीन लढ्याचीही तयारी ठेवली होती. त्यांचे परतीचे प्रयत्नही सुरू असल्याने दरम्यानच्या काळात यासंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, संध्याकाळी कुलपतींनी ही कारवाई करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ऍक्‍टच्या कलम 11 (14) (ई) नुसार असलेल्या अधिकारांचा वापर करून कुलपतींनी ही कारवाई केली. ऑनस्क्रीन ऍसेसमेंट पद्धतीची सदोष अंमलबजावणी व त्यातून विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यास झालेली अभूतपूर्व दिरंगाई तसेच याबाबत कुलपतींनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे या कारणांमुळे त्यांना पदावरून दूर करण्यात येत आहे, असे कुलपतींच्या आदेशात म्हटले आहे.

यावर्षीपासून एकाएकी व नव्यानेच सुरू झालेल्या ऑनस्क्रीन पेपर तपासणी पद्धतीत मोठा गोंधळ झाल्याने विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल तीन ते चार महिने लांबले. त्यामुळे पुढील शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली, याबाबत विद्यार्थी संघटना तसेच अनेक राजकीय पक्षांनीदेखील आंदोलने केली होती. कुलगुरूंना परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी कुलपतींनी पाच ते सहा वेळा मुदत दिली; मात्र त्या अवधीत निकाल जाहीर झाले नाहीत. त्यामुळे अखेर देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून विद्यापीठाची सूत्रे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली.

ऑनस्क्रीन ऍसेसमेंटचा निर्णय मागील वर्षी डिसेंबर महिन्यात देशमुख यांनी जाहीर केला. तेव्हाच त्यातील अडचणी व धोके यांची कल्पना त्यांना प्राध्यापकांनी दिली होती व ही पद्धती एवढ्यात लागू न करण्याची विनंती केली होती. मार्च 2017 च्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका या पद्धतीने तपासण्याऐवजी ऑक्‍टोबर 2017 च्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासाव्यात. त्या अनुभवातून आपल्याला मार्च 2018 च्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासता येतील, असे प्राध्यापकांचे म्हणणे होते. मात्र ते न ऐकता देशमुख यांनी आपला निर्णय लादला, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. यामुळे उद्भवलेल्या निकाल उशीरा लागण्याच्या गोंधळाची माहिती घेण्याकरिता त्यांना जुलैमध्ये विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बोलावण्यात आले होते. मात्र, तेथेही त्यांनी व्यवस्थित माहिती दिली नाही, तेव्हा नव्वद हजार उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिलीच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री तोंडघशी पडल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. या सर्व गोंधळामुळे देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!