Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
शिवसेना राहटणी काळेवाडी विभागांच्या वतीने सत्ताधारी व प्रशासनाच्या अनागोंधी कारभाराच्यानिषेधार्थ शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शन खाली जाहीर निदर्शने करण्यात येणार - युवराज भगवान दाखले.

व्हीएस न्यूज - मंगळवार दिनांक २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता छञपती शिवजी महाराज अर्धाकृती पुतळा ग प्रभाग समोर थेरगाव या ठिकाणी शिवसेना राहटणी काळेवाडी विभागांच्या वतीने सत्ताधारी व प्रशासनाच्या अनागोंधी कारभाराच्या तसेच २०१५ला प्राईड होम सोसायटी समोरील संबधीत जागामालकांनी तापकिरनगर परिसरातील रोडची जागा हस्तांतरीत करून सुध्दा स्थानिक पुढार्यांच्या दबावा ने रोड चे काम रखडले त्याच्या निषेधार्थ शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शन खाली जाहीर निदर्शने करण्यात येणार आहे तरी आपण उपस्थित राहुन तेथील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे अशी विनंती शिवसेना प्रभाग प्रमुख राहटणी काळेवाडी,शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा.युवराज भगवान दाखले.यांनी केली आहे
...Read More

V. S. News
ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक – रमेश सरदेसाई

व्हीएस न्यूज - प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणा-या फसवणुकीबाबत व अन्याया विरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजुन घेणे आवश्यक आहे. असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. भोसरी येथील स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी अमर तेजवानी,प्रमिला वाघमोडे, ग्रंथपाल वर्षा जाधव यांच्यासह बहुसंख्येने अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते. वस्तू किंवा सेवेत कमतरता, त्रुटी असल्यास ती दूर करून घेण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याने दिला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत १९८४ साली पुण्यात स्थापन झाली. ग्राहकांची हि पहिलीच भारतीय संघटना आहे. ग्राहकांची रोजच्या व्यवहारात होणारी फसवणूक, लुटमार थांबविण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्नपूर्वक ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी संसदेत पास करून घेतला. भारतातील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहणे महत्वाचे असुन दैनंदिन जीवनक्रमामध्ये होणा-या फसवणुकीबाबत “ग्राहक न्यायालयात” दाद मागितली पाहिजे. प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीची उद्दिष्टे, याबाबतची माहिती समजुन घेणे गरजेचे आहे. ग्राहकांची फसवणुक करुण व्यापा-यांनी अवाजवी नफा कमवू नये. कायद्यानुसार ग्राहक न्यायालयामध्ये तक्रारदाराला ९० दिवसात न्याय मिळणे अपेक्षीत आहे. प्रत्येक वस्तु व सेवा विकत घेताना ग्राहकाने कायदेशीर बिल घेणे आवश्यक आहे. बिल असेल तर ग्राहकाला ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. ग्राहकाने वाहन, घर आदी विकत घेताणा त्याबाबतचा करारनामा वाचल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करावी. प्रत्येक ग्राहकाने जागरुक असने गरजेचे असून माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करावा. हॉस्पिटल, न्यायालय, वाहन परिवहन, हवाई सेवा, जल प्रवास, विद्युत सेवा, सर्व राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महसुल विभाग आदी विभागाकडून नागरिकांना देण्यात येणा-या सेवा पारदर्शी करण्यासाठी ग्राहक पंचायतींची आवश्यकता असल्याचे मतही व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले.

जिल्हा ग्राहक न्यायालयामध्ये एक अध्यक्ष व दोन सदस्य अशी रचना असते. आपले म्हणणे लिखित स्वरुपात पुराव्यासहित किमान ४ प्रतीमध्ये सादर करावे. आपला खटला आपण लढवू शकतो. तसेच जरुरत पडल्यास वकील हि देता येतो. जिल्हा ग्राहक न्यायालयात २० लाखा पर्यंतच्या तक्रारी दाखल करता येतात त्यापुढे १ कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगापुढे दाखल करता येतात. १ कोटीच्या पुढील तक्रारी राष्ट्रीय आयोगाकडे दाखल करता येतात. त्यापुढे सुप्रीम कोर्टात अपील करता येते. मोर्चे, रास्ता रोको, तोडफोड, घेराव असे कायदेभंगाचे मार्ग न अवलंबता सविनय कायदे पालन हे सूत्र ग्राहक पंचायतीने सिद्ध करून दाखविले आहे. सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य तसेच सार्वजनिक क्षेत्रात लोकांच्या अडाणीपणामुळे लोकांचे शोषण होत असुन यामुळे त्यांचा अर्थिक दर्जा उंचावत नसल्याने सामाजिक असमतोल वाढल्याचे दिसुन येते. असे ही ते म्हणाले.

...Read More

V. S. News
भोसरीत माळी समाजाचा वधू - वर मेळावा संपन्न

व्हीएस न्यूज - भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत राज्यस्तरीय माळी समाज वधू वर परिचय मेळाव्यात सहाशे एक (मुले377, मुली 225) इच्छुक वधू - वरांनी सहभाग घेतला होता. मेळाव्याचे उद्‌घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, नगरसेवक संतोष लोंढे, राहूल जाधव, लक्ष्मण सस्ते, नम्रता लोंढे, पिंपरी चिंचवड माळी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे, डॉ अनु गायकवाड, उद्योजक सुदाम अभंग, चंद्रकांत रासकर, ज्ञानेश्वर विधाटे, भास्कर बुरडे, सिने अभिनेता संतोष माने, मेळावा प्रमुख मच्छिंद्र दरवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम ताम्हाणे, शाम गायकवाड, हनुमंत लोंढे, पंढरीनाथ राऊत, गणपत विधाटे, उत्तम गायकवाड, नोटरी क्लब पिंपरी अध्यक्ष जसबिंदर सिंग, अध्यक्षा वर्षा पांगारे आदींसह इच्छुक वधू - वर,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पैसे सुट्टे करून देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक

व्हिएस न्यूज - शितपेयाची ऑर्डर देण्याचा बनाव करत पैसे सुट्टे देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने शितपेयाची डिलेव्हरी करणाऱ्या टेम्पो चालकाचे भामट्याने 16 हजार रूपये लंपास केले. ही घटना गुरूवारी सव्वा दोनच्या सुमारास थेरगाव येथील अरूण पार्क बिल्डिंगच्या पार्किमध्ये घडली.
शरद पिंजन (वय-39, रा. किन्हई, देहूरोड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंजन हे एका शितपेयाच्या कंपनीत टेम्पो चालक म्हणून काम करतात. गुरूवारी ते थेरगाव येथील अरूण पार्कमध्ये डिलेव्हरी मुलगा अजयला टेम्पोतील शितपेय काढून देत होते. शितपेयाची ऑर्डर देण्याचा बनाव करत त्यांच्याजवळ एक जण आला. पैसे सुट्टे करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने 16 हजार रूपये घेवून पसार झाला.
फौजदार एच. व्ही. माने अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
नवीन वर्षात तरी पिंपरी- चिंचवडला मंत्रिपद मिळणार का?

व्हिएस न्यूज - राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन 3 वर्षे झाली. पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपाचे आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीची 15 वर्षांची सत्ता घालवून भाजपची एकहाती सत्ता आणली, मात्र, अजूनही पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळाले नाही. आता 2017 संपत आले आहे. व 2018 ला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात तरी , पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळणार का? याबाबत शहरवासीयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांची 15 वर्ष निर्विवाद सत्ता होती. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केला. आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडले. त्यानंतर, आमदार महेश लांडगे व माजी महापौर आझम पानसरे यांच्या मदतीने 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यामुळे, आता पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा पिंपरी- चिंचवडच्या नागरिकांना वाटू लागली.

मात्र, 2017 हे वर्ष संपत आले तरी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे, आता 2018 ला तरी पिंपरी- चिंचवड शहराला नवीन वर्षात मंत्रिपद मिळणार का? अशी आशा शहरातील नागरिकांना लागली आहे. ही, आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करणार का? हे येणारे वर्षच ठरवेल.
...Read More

V. S. News
शेतीमध्ये अणुऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे - डॉ. एस.टी. म्हेत्रे

व्हिएस न्यूज - अणुऊर्जेचा वापर हा वीज निर्मिती, कॅन्सर रोगांवर इलाज, औद्योगिक क्षेत्र, शेती आणि अन्न धान्यांची साठवणूक, मूलभूत संशोधनांमध्ये केला जातो. शेती क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा वापर करून अनेक महत्वपूर्ण शोध लावले असून शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि शेती उत्पादन वाढवावे. असे आवाहन बीएआरसीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. एस.टी.म्हेत्रे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे मुंबईतील भाभा ॲटोमीक रिसर्च सेंटरच्या (बीएआरसी) वतीने ‘शांतता, शक्ती आणि प्रगती साठी अणु ऊर्जा’(ATOMIC ENERGY FOR PEACE, POWER AND PROSPERITY)या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. एस.टी. म्हेत्रे बोलत होते. यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रिजचे मुख्य व्यवस्थापक जी. के. पिल्लई, इंडियन न्युक्लिअर सोसायटीचे सचिव आर. के. सिंग, पीसीओेईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, बीएआरसीचे समुह संचालक आर. एस. यादव, ज्येष्ठ संशोधक हेमंत शिंपी, संगणक विभाग प्रमुख प्रा. महेंद्र साळुंके आदींसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. म्हेत्रे मार्गदर्शन करताना म्हणाले की, उत्परिवर्तन ही निसर्गनिर्मित प्रक्रिया असून जनुकांमध्ये बदल होत असतात. परंतु हे बदल होण्यासाठी जास्त काळ लागतो. विकिरणांच्यामुळे ही बदल होण्याची क्रिया आपण अधिक वेगाने घडवून आणू शकतो. कारण विकिरणांमुळे जनुकांमध्ये बदल केले जातात आणि त्यापासून नवीन प्रजाती विकसित केली जाते. अशा प्रकियेच्या मदतीमुळे भाभा अणु संशोधन केंद्राने पिकांच्या 42 जाती विकसित केल्या आहेत. तसेच कडुनिंब एक प्रभावी कीड नाशक आहे. लिंबोळ्याच्या बि मध्ये तेल असते ज्यामध्ये अझाडिरॅक्टिन नावाचा घटक असतो. त्यामुळे लिंबोळीमध्ये कीडनाशक गुणधर्म आढळतात. याचे तंत्रज्ञान बीएआरसी आणि विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT) नागपूर यांनी मिळून विकसित केले आहे. यामध्ये लिंबोळीपासून पावडर बनवली जाते आणि त्याच्या कणांची जाडी जसजशी कमी होईल तसे त्याचा प्रभाव वाढल्याचे आढळून आले आहे. हे तंत्रज्ञान खाजगी कंपनीला हस्तांतरित केलं असून थोड्याच काळात यावर आधारित उत्पादन बाजारांत दाखल होईल. रासायनिक औषधे आणि खतांच्या अतीवापरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून नापीक जमिनीची आकडेवारी फुगत चालली आहे. या रासायनिक शेतीने माती, हवा, पाणी जेव्हा मृतवत होईल. तेंव्हा मानवाचे डोळे उघडतील आणि मगच नैसर्गिक शेतीचे महत्व लोकांना समजेल व लोक नैसर्गिक शेतीकडे वळतील. परंतु आता जमिनी खराब होण्याची वाट न बघता सर्व शेतक-यांनी लवकर या पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. असे घडले तर भविष्यकाळ उज्वल होईल यात शंका नाही. भाभा अणु संशोधन केंद्राने अशा प्रकारे शेतीच्या विविध क्षेत्रामध्ये भरीव योगदान केले आहे. शांततेसाठी अणु ऊर्जेचा वापर कसा करता येऊ शकतो हे येथील शास्त्रज्ञांनी आपल्या अथक प्रयत्नाने आपल्याला दाखवून दिले आहे. आता या तंत्रज्ञानाचा सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असेही आवाहन डॉ. एस.टी. म्हेत्रे यांनी केले.
...Read More

V. S. News
स्वच्छता सर्वेक्षणात प्रथमस्थानी येणार - काळजे

व्हिएस न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर येण्याचा निर्धार उद्योगनगरीने केला आहे. यापूर्वी स्वच्छतेच्या कामात झालेली प्रचंड घसरण लक्षात घेता यंदा वरच्या स्थानावर जाण्यासाठी सर्वानीच प्रयत्न सुरू केले असल्याचे या निमित्ताने दिसून येते.

महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या वेळी महापालिकेच्या स्वच्छतादूत अंजली भागवत, पक्षनेते एकनाथ पवार, सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मनोज लोणकर आदी उपस्थित होते. अधिकाधिक मोबाइल स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करून स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हावे आणि पिंपरी-चिंचवड देशात प्रथम क्रमांकाचे शहर होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले आहे.

ते म्हणाले, स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यास नागरिकांना प्रवृत्त करणे, हागणदारीमुक्त व स्वच्छतेच्या बाबतीत शहरांची कायमस्वरूपी क्षमता वाढवणे हा या सव्‍‌र्हेक्षणाचा उद्देश आहे. देशभरातील ४०४१ शहरांमध्ये चार जानेवारीपासून ही मोहीम सुरू होणार आहे. त्यासाठी पिंपरी पालिकेने आवश्यक तयारी केली आहे. महापालिकेकडून मिळालेली माहिती, प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे मिळालेली माहिती व नागरिकांच्या प्रतिसादाद्वारे प्राप्त झालेली माहिती अशा तीन भागात ही माहिती संकलित केली जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचे मूल्यांकन गुणांच्या आधारे केले जाणार असून त्याची वर्गवारी सहा भागांत करण्यात आली आहे. संकलन व वाहतूक, विल्हेवाट व प्रक्रिया, स्वच्छता व हागणदारी मुक्तता, माहिती-शिक्षण व संवाद, क्षमता बांधणी, नावीन्यक्रम उपक्रम, स्वतंत्र प्रमाणीकरण व निरीक्षण आदींचा त्यामध्ये समावेश आहे. नागरिकांसाठी १९६९ हा राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील कोणीही नागरिक चार जानेवारीपासून या क्रमांकावर मिस कॉल देऊन सर्वेक्षणात सहभागी होऊ शकतात. ‘तुमचा परिसर स्वच्छ दिसतो का’, ‘तुमच्या भागात कचरापेटय़ा आहेत का’, ‘त्या सहजपणे सापडतात का’, ‘कचरा नियमितपणे संकलित केला जातो का’, ‘शौचालयाची उपलब्धता आहे का’, ‘पायाभूत सुविधा चालू स्थितीत आहेत का’, यांसारखे प्रश्न नागरिकांना विचारण्यात येणार आहेत. आजमितीला १९ हजार नागरिकांनी स्वच्छतेचे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. त्या आधारे तीन हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत व त्यातील २३०० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
चिंचवडमधून 12 वर्षीय मुलगा बेपत्ता

व्हिएस न्यूज - राहत्या घरातून 12 वर्षीय मुलगा मंगळवारी बेपत्ता झाला आहे.
अनिकेत काशीनाथ चिक्कळी (वय-12, रा. आई साई निवास, वृंदावन कॉलनी, चिंचवडेनगर) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील काशिनाथ सिध्दराम चिक्कळी (वय-43) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. दुपारी एकला घरी येऊन शाळेची बॅग, ड्रेस काढून तो बाहेर गेला. त्याचा शोध घेतला असता तो सापडून आला नाही. त्यानंतर त्याच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. अनिकेत रंगाने गोरा, उंची 4.5 फुट, अंगाने मजबुत, उजव्या हाताला सहा बोटे, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे, पांढऱ्या रंगाचा टि शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात सॅन्डल घातला आहे, अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्याच्या वडिलांच्या
8087252775 या मोबाईल क्रमांकावर किंवा चिंचवड पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
रिक्षाच्या धडकेत महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू 

व्हिएस न्यूज - रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांपैकी एका महाविद्यालयीन तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बोपोडीतील मानाजीबाग एलफिस्टन रोडवर घडली.
सुरज रमेश बत्तीशे (वय-20, रा. शासकीय हॉस्टेल, विश्रांतवाडी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अमोल यशवंत सातदिवे (वय-18) हा जखमी झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज व त्याचा मित्र अमोल हे दुचाकीवरून बोपोडीतील मानाजीबाग एलफिस्टन रोडवरून जात होते. पाठीमागून आलेल्या रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी चालवणारा सुरज खाली पडून गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला अमोलही जखमी झाला आहे. रिक्षा चालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. फौजदार कांबळे अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
मोटारीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

व्हिएस न्यूज - कामावरून पायी घरी जाणाऱ्या मोटारीच्या धडकेत एका महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मोटार चालकाने रस्त्यावरील एका दुचाकीला धडक देत विजेच्या खांबाला मोटार धडकली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता खडकीतील सीएएफडी ऑफिसर मेसच्या समोर घडली.
भागिरथी शंकर चांदणे (वय-52, रा. खडकी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा गणेश चांदणे (वय-26) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता कामावरून घऱी जात होत्या. पाठीमागून आलेल्या मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर मोटारीने रस्त्यावरील एका दुचाकीला व विजेच्या खांबालाही धडक दिली. मोटार चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!