व्हीएस न्यूज - भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत राज्यस्तरीय माळी समाज वधू वर परिचय मेळाव्यात सहाशे एक (मुले377, मुली 225) इच्छुक वधू - वरांनी सहभाग घेतला होता. मेळाव्याचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, नगरसेवक संतोष लोंढे, राहूल जाधव, लक्ष्मण सस्ते, नम्रता लोंढे, पिंपरी चिंचवड माळी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे, डॉ अनु गायकवाड, उद्योजक सुदाम अभंग, चंद्रकांत रासकर, ज्ञानेश्वर विधाटे, भास्कर बुरडे, सिने अभिनेता संतोष माने, मेळावा प्रमुख मच्छिंद्र दरवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम ताम्हाणे, शाम गायकवाड, हनुमंत लोंढे, पंढरीनाथ राऊत, गणपत विधाटे, उत्तम गायकवाड, नोटरी क्लब पिंपरी अध्यक्ष जसबिंदर सिंग, अध्यक्षा वर्षा पांगारे आदींसह इच्छुक वधू - वर,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.