व्हिएसन्यूज - राहत्या घरातून 12 वर्षीय मुलगा मंगळवारी बेपत्ता झाला आहे.
अनिकेत काशीनाथ चिक्कळी (वय-12, रा. आई साई निवास, वृंदावन कॉलनी, चिंचवडेनगर) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील काशिनाथ सिध्दराम चिक्कळी (वय-43) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. दुपारी एकला घरी येऊन शाळेची बॅग, ड्रेस काढून तो बाहेर गेला. त्याचा शोध घेतला असता तो सापडून आला नाही. त्यानंतर त्याच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. अनिकेत रंगाने गोरा, उंची 4.5 फुट, अंगाने मजबुत, उजव्या हाताला सहा बोटे, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे, पांढऱ्या रंगाचा टि शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात सॅन्डल घातला आहे, अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्याच्या वडिलांच्या 8087252775 या मोबाईल क्रमांकावर किंवा चिंचवड पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.