व्हिएसन्यूज - रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांपैकी एका महाविद्यालयीन तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बोपोडीतील मानाजीबाग एलफिस्टन रोडवर घडली.
सुरज रमेश बत्तीशे (वय-20, रा. शासकीय हॉस्टेल, विश्रांतवाडी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अमोल यशवंत सातदिवे (वय-18) हा जखमी झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज व त्याचा मित्र अमोल हे दुचाकीवरून बोपोडीतील मानाजीबाग एलफिस्टन रोडवरून जात होते. पाठीमागून आलेल्या रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी चालवणारा सुरज खाली पडून गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला अमोलही जखमी झाला आहे. रिक्षा चालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. फौजदार कांबळे अधिक तपास करत आहेत.