कोटक महिंद्रा बॅंकेच्या एटीएममधून आठ बॅटऱ्यांची चोरी
पिंपरी – चिंचवड
2017-12-29
व्हिएसन्यूज - कोटक महिंद्रा बॅंकेच्या एटीएममधून एक युपीएस व एक्साईड कंपनीच्या आठ बॅटऱ्या असा 50 हजार रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्या आहेत. ही घटना बुधवारी पिंपरीतील मुख्य बाजार पेठेत सकाळी उघडकीस आली.
सुनिल सावंत (वय-40, रा. रामनगर, येरवडा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी मुख्य बाजारात कोटक महिंद्रा बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएममधून चोरट्याने एक युपीएस, काळ्य़ा रंगाच्या एक्साईड कंपनीच्या आठ बॅटऱ्या असा 50 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.