व्हिएसन्यूज - कामावरून पायी घरी जाणाऱ्या मोटारीच्या धडकेत एका महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मोटार चालकाने रस्त्यावरील एका दुचाकीला धडक देत विजेच्या खांबाला मोटार धडकली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता खडकीतील सीएएफडी ऑफिसर मेसच्या समोर घडली.
भागिरथी शंकर चांदणे (वय-52, रा. खडकी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा गणेश चांदणे (वय-26) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता कामावरून घऱी जात होत्या. पाठीमागून आलेल्या मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर मोटारीने रस्त्यावरील एका दुचाकीला व विजेच्या खांबालाही धडक दिली. मोटार चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.