पैसे सुट्टे करून देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक
वाकड
2017-12-29
व्हिएसन्यूज - शितपेयाची ऑर्डर देण्याचा बनाव करत पैसे सुट्टे देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने शितपेयाची डिलेव्हरी करणाऱ्या टेम्पो चालकाचे भामट्याने 16 हजार रूपये लंपास केले. ही घटना गुरूवारी सव्वा दोनच्या सुमारास थेरगाव येथील अरूण पार्क बिल्डिंगच्या पार्किमध्ये घडली.
शरद पिंजन (वय-39, रा. किन्हई, देहूरोड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंजन हे एका शितपेयाच्या कंपनीत टेम्पो चालक म्हणून काम करतात. गुरूवारी ते थेरगाव येथील अरूण पार्कमध्ये डिलेव्हरी मुलगा अजयला टेम्पोतील शितपेय काढून देत होते. शितपेयाची ऑर्डर देण्याचा बनाव करत त्यांच्याजवळ एक जण आला. पैसे सुट्टे करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने 16 हजार रूपये घेवून पसार झाला.