Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी दगावल्याचा आरोप;  वडिलांकडून दवाखान्याची तोडफोड

व्हिएस न्यूज - डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलगी दगावली असा आरोप करीत मुलीच्या वडिलांनी दवाखान्याची तोडफोड केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रहाटणी येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. दामोदर मल्लिकार्जुन गाडेकर (वय 65, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2017 मध्ये दामोदर यांची एकलुती एक मुलगी प्रिया हिला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने रहाटणीतील मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिची प्रकृती खालावल्याने तिला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला.
याचाच राग मनात धरून गाडेकर हे वारंवार मेट्रो रुग्णालयात येऊन डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलगी गेल्याचा आरोप करीत धमकी देत होते. रविवारी सकाळी ते मुलीचा फोटो आणि खुर्ची घेऊन रुग्णालयात आले. मुलीच्या फोटोला हार घालून त्यांनी हातोड्याने रुग्णालयात तोडफोड करण्यास सुरवात केली. यामध्ये रुग्णवाहिका आणि रुग्णालयाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.
याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, गाडेकर हे रोज दवाखान्यात येऊन धमकी देत होते. काही दिवसांपार्वूी ते कुऱ्हाड घेऊनही परिसरात फिरत होते. काहीवेळा त्यांनी आमच्याकडे पैशाचीही मागणी केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव पुढील तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
भीमा-कोरेगाव घटनेची होणार न्यायालयीन चौकशी – मुख्यमंत्री

व्हीएस न्युज - मवारी सकाळी भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या गाड्यांवर पुण्यातील नगर रस्त्यावरील सणसवाडी येथे अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली असून राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची विनंती सर्वौच्च न्यायालयाकडे करणार असल्याची माहिती दिली.

फडणवीस यावेळी बोलाताना म्हणाले की, राहुल नावाचा तरुण येथील हिंसाचारात ठार झाला आहे. याची सीआयडी चौकशी करण्याची व मृताच्या नातेवाईकाला १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. राज्यभरात भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटत असून मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.
...Read More

V. S. News
पिंपरीत भीमा कोरेगावमधील घटनेचा पडसाद

व्हिएस न्यूज – भीमा कोरेगाव येथे शौर्यदिन साजरा करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांची जाळपोळ केल्याच्या घटनेचे पिंपरी-चिंचवडमध्येही तीव्र पडसाद उमटले. आंबेडकरी जनतेने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. त्यामुळे चौकात प्रचंड वाहतूककोंडी झाली. वाहने जागेवरच थांबविण्यात आल्यामुळे पिंपरी कॅम्प, नेहरूनगर, निगडी आणि दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी शौर्यदिन पाळला जातो. राज्यभरातून आंबेडकरी जनता भीमा कोरेगाव येथील स्तंभाला वंदन करण्यासाठी जाते. त्यानुसार सोमवारी (दि. १) भीमा कोरेगावकडे जाणारी वाहने पुणे-नगर मार्गावरील सणसवाडीजवळ जाळण्यात आली. तसेच अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली.

या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तणाव वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही घटनेचे तीव्र पडसाद उमटले. शहरातील आंबेडकरी जनतेने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करत या घटनेचा निषेध केला. या आंदोलनामुळे चौकात प्रचंड वाहतूककोंडी झाली. वाहने जागेवरच थांबविण्यात आल्यामुळे पिंपरी कॅम्प, नेहरूनगर, निगडी आणि दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
...Read More

V. S. News
पिंपरीत भीमा कोरगावच्या घटनेचा निषेध

व्हीएस न्यूज - पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी रास्ता रोको केला. चौकात भीमसैनिकांनी ठिय्या मांडला असून चौकातून सर्व मार्गानी येणारी वाहने अडवून निषेध नोंदविण्यात येत आहे. चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भीमा कोरेगाव मधील घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले असून विश्रांतवाडी परिसरातील मुख्य चौकात निषेध करण्यासाठी जमाव जमला आहे. व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.

...Read More

V. S. News
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे द्या - आमदार जगताप

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी 1997 मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 2012 मध्ये कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती करून त्यांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्यास सुरूवात केली. मात्र फेब्रुवारी 2017 मध्ये चार सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक झाली. त्यानुसार 32 निवडणूक प्रभाग झाले आहेत. ही प्रभाग रचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये,तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.

ही नवीन आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतीदिनापासून म्हणजे 9 ऑगस्ट 2017 पासून अस्तित्वात आली आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना प्रशासनाने कामकाजाच्या सोईसाठी 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग' आणि 'ह' अशी नावे दिली आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना नावे नसल्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडत आहे. त्यामुळे या कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे दिल्यास ते नागरिकांना सहज लक्षात ठेवता येईल. तसेच क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचाही गौरव होईल. त्यानुसार 'अ' क्षेत्रीय कार्यालयाला पन्हाळगड, 'ब' क्षेत्रीय कार्यालयाला पुरंदर, 'क' क्षेत्रीय कार्यालयाला सिंहगड, 'ड' क्षेत्रीय कार्यालयाला रायगड, 'इ' क्षेत्रीय कार्यालयाला शिवनेरी, 'फ'क्षेत्रीय कार्यालयाला देवगिरी, 'ग' क्षेत्रीय कार्यालयाला सिंधुदुर्ग आणि 'ह' क्षेत्रीय कार्यालयाला प्रतापगड हे नाव देण्यात यावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. दरम्यान, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रभाग कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेची आठ प्रशासकीय कार्यालये लवकरच गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.

...Read More

V. S. News
मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून करू नये - ॲड. मंजुषा इधाटे

व्हीएस न्यूज - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये, तसेच मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, असे प्रतिपादन अॅड. मंजुषा इधाटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धा परीक्षा केंद्रात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अॅड प्रा. आण्णासाहेब ठोसर, अॅड मंजुषा इधाटे, अलका जोशी, नागरिक व अभ्यासक विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी अॅड मंजुषा इधाटे म्हणाल्या, मानवी हक्काच्या रक्षणासाठी न्यायालयांचा उपयोग होतो. मानव अधिकार म्हणजे सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होय. सन्मानाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये कुटुंब निर्माण करण्याचा कुटुंबात राहण्याचा, जीवन समृद्ध करण्यासाठी व जीवनाचा विकास करण्यासाठी म्हणून शिक्षण घेण्याचा अधिकार यामध्ये येतो. शिक्षण घेतल्यावर आवडीचा व्यवसाय करण्यासाठी व त्यासाठी मुक्त संचार करण्याचा तसेच स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार म्हणजे मानव अधिकार होय, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी अॅड प्रा.आपासाहेब ठोसर म्हणाले, राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बहुतेक नागरिकांना या विषयाचे ज्ञान नसल्याने ते वंचित राहतात. कायदा म्हणजे सागर आहे. कशासाठी व कोणासाठी जगायचे याचे तत्वज्ञान मानव अधिकारामध्ये आहे. सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घटना आहे. मानव अधिकारांचे संरक्षण व्हावे असेही ते यावेळी म्हणाले. मानवी हक्क दिनानिमित्त अलका जोशी यांनीही माहिती दिली. मानवी मूल्यांना बाधा न पोहचता प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य हि घटनेने दिले आहे. आजच्या युवा पिढीने मानवी हक्क व कर्त्यव्याची जाणीव परिसरातील नागरिक व मित्र परिवारांना करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असेही यावेळी अलका जोशी यांनी सांगितले. यावेळी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचनही करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी यांनी केले.

...Read More

V. S. News
'ड्रंक अँड ड्राईव्ह' करणाऱ्या 1165 जणांवर गुन्हा दाखल

व्हीएस न्यूज - नववर्षाच्या स्वागताला मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 1165 जणांवर पुणे शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागात 31 डिसेंबरच्या रात्री नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरते.

शहरातील एफसी रोड, एमजी रोड, हडपसर, हिंजवडी या भागात मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन साजरे केले जाते. यावेळी काही अतिउत्साही तरूण दारू पिवून धिंगाणा घालतात. अशा तरुणांना रोखण्यासाठी शहरातील प्रमुख चौकात आणि मोक्याच्या 28 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये अल्कोमीटर आणि ब्रेथअॅनलायझरद्वारे ठिकठिकाणी तपासणी करून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.

...Read More

V. S. News
भीमा कोरेगावजवळ दगडफेक व गाड्यांची तोडफोड

व्हीएस न्यूज - पुणे-नगर मार्गावर सणसवाडी परिसरात अज्ञांताकडून गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यात 40 हून अधिक कार, गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर येत आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तासभर तणावपूर्ण स्थिती होती. मात्र, तेथे सीआरएफच्या तुकड्या पाठवल्या आहेत. सध्या स्थितीवर पूर्ण नियंत्रणात परिस्थिती निवळली आहे. दरम्यान, वढू बुद्रुक येथे नामफलकावरून दोन गटातील वादावरून दगडफेकीची घटना घडल्याचे समोर येत आहे. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गावरील गावे बंद ठेवण्यात आली आहेत. तेथून जवळच असलेल्या भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांचा शौर्य दिन कार्यक्रम आज साजरा होत आहे. त्यामुळे या दगडफेक घटनेकडे भीमा कोरेगावची तर पार्श्वभूमी नाही ना हे तपासले जात आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास काही अज्ञांत टोळक्याने नगर-पुणे मार्गावरील सणसवाडी परिसरात अचानक कार व गाड्यांवर दगडफेक सुरू केली. कोणाला काहीच कळायच्या आत तरूणांनी दगडफेक सुरू केली. मात्र, दगडफेक का आणि कोणी केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. आज सकाळी नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ होती. त्यामुळे स्थिती तणावपूर्ण होती. मात्र, पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवले. त्याचवेळी त्यांच्या मदतीला सीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

...Read More

V. S. News
दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडी येथे एका 25 वर्षाच्या विवाहितेने तर भोसरीत 30 वर्षाच्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अश्विनी राहुल रणसिंग (वय-25, रा श्रीकृष्ण कॉलनी, काळेवाडी) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी हिने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे पती राहुल हे एका खासगी मोटारीवर चालक म्हणून काम करतात. सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर दुपारी ते जेवणासाठी घऱी आले असता त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिला मात्र घरातून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
दुसऱ्या घटनेत भोसरीमध्ये परेश महेश्वर बेहेरा (वय 30 रा. फुगे चाळ, खंडोबामाळ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चाळ मालक निवृत्ती भगवान फुगे (वय 50) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगे हे त्यांच्या पत्नीसह भोसरी येथे राहतात. परेश याची पत्नी गावाला गेली आहे. सोमवारी दुपारी चार वाजले तरी घराचा दरवाजा का उघडला जात नाही म्हणून निवृत्ती फुगे यांनी परेश यांना आवाज दिला. बराचवेळ आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी परेश याने घरातील पंख्याला साडीच्या सहायाने गळफास घेतल्याचे उघड झाले.
वाकड व भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
...Read More

V. S. News
पालिकेसमोर 'कचरा फेको' आंदोलन करणाऱ्या नगरसेविकेसह 20 जणांवर गुन्हा

व्हीएस न्यूज - प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ पालिकेच्या प्रवेशव्दारावर कचरा टाकून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविकेच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून जनतेच्या हितासाठी दहा गुन्हे दाखल झाले तरी हरकत नसल्याचे नगरसेविका पौर्णिमा सोनवणे म्हणाल्या. नगरसेविका पौर्णिमा रवींद्र सोनवणे (वय-42, रा. रूपीनगर), त्यांचे पती रवींद्र आप्पा सोनवणे (वय 46) यांच्यासह 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेचे सहायक सुरक्षा अधिकारी विलास बाबासाहेब वाबळे (वय-55) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका सोनवणे व त्यांच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता पालिकेच्या प्रवेशव्दारावर कचरा टाकत गोंधळ घातला. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण सर्वत्र दुर्गंधी पसरली. पालिकेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, सोनवणे या प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगरमधून निवडून आल्या आहेत. या परिसरातील आणि सोसाट्यांमधील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला जात नव्हता. परिसरात जागो-जागी कचऱ्याचे ढीगच्या-ढीग तर सोसाट्यांमध्ये देखील कचऱ्याचे ढीग साचले होते. सर्वत्र कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरली होती. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या नगरसेविका सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांने प्रवेशद्वारासमोर टाकला होता.
समस्या मांडली म्हणून गुन्हे दाखल करणे चुकीचे
पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमाकांवर येण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे प्रभागातील कचरा उचल्याण्यासाठी नगरसेवकांना आंदोलन करावे लागत आहे. निष्क्रिय प्रशासान प्रश्न मार्गी लावयाचे सोडून आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर, करदात्या नागरिकांवर गुन्हे दाखल करत आहे. यावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!