व्हीएस न्यूज - लोहगडावर आज वणवा पेटल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुर्गप्रेमीकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गडावर सध्या अनेक पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. तसेच गडावर असलेल्या दर्ग्याच्या उरुसासाठी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक जमले आहेत. दोन दिवसांपूर्वी गडाच्या पायथ्याला असाच वणवा पेटला होता. धूम्रपान करणाऱ्या मंडळींमुळे असे प्रकार घडत असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.