व्हिएस न्यूज - कंपनीत उंचावर काम करत असताना तोल जाऊन मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुुपारी बारा वाजता एमआयडीसी येथील एचपीजेसी या कंपनीत घडली.
निगाह सब्दार अली (वय 35 रा. भवानीपेठ, पिंपरी) असे मयत कामगाराचे नाव आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये काम करत असताना तोल जाऊन निगाह खाली पडले. यामध्ये त्यांना जबर मार लागला. उपचारासाठी त्यांना पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.