भीमा-कोरेगाव घटनेची होणार न्यायालयीन चौकशी – मुख्यमंत्री
मुंबई
2018-01-02
व्हीएसन्युज - मवारी सकाळी भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या गाड्यांवर पुण्यातील नगर रस्त्यावरील सणसवाडी येथे अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली असून राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची विनंती सर्वौच्च न्यायालयाकडे करणार असल्याची माहिती दिली.
फडणवीस यावेळी बोलाताना म्हणाले की, राहुल नावाचा तरुण येथील हिंसाचारात ठार झाला आहे. याची सीआयडी चौकशी करण्याची व मृताच्या नातेवाईकाला १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. राज्यभरात भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटत असून मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.