व्हीएस न्यूज - पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातभीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी रास्ता रोको केला. चौकात भीमसैनिकांनी ठिय्या मांडला असून चौकातून सर्व मार्गानी येणारी वाहने अडवून निषेध नोंदविण्यात येत आहे. चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भीमा कोरेगाव मधील घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले असून विश्रांतवाडी परिसरातील मुख्य चौकात निषेध करण्यासाठी जमाव जमला आहे. व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.