Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
घरात घुसून महिलेला मारहाण, तीन मोबाईल हिसकावले

व्हीएस न्यूज - घरात जबरदस्तीने घुसून एकाने महिलेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. महिलेकडील 36 हजारांचे मोबाईल हिसकावून नेले. लॅपटॉपचे नुकसान केले. ही घटना वाकड येथे सोमवारी रात्री साडेबारा वाजता सुखासा सोसायटीत घडली.
दिग्विजय सुनिल राजुरकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. महिलेकडील 36 हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेले. तसेच लॅपटॉपचेही नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. घोळवे अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पिंपरीत तरूणावर चाकूने वार

व्हीएस न्यूज - दुकानासमोर मित्रासमवेत गप्पा मारत थांबलेल्या तरूणाला 'तु माझ्याकडे रागाने का पाहतो' असे म्हणत एकाने चाकूने वार केले. त्याच्या दोन साथीदारांनी सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना पिंपरीतील साईराज रेफ्रीजरेशन कंपनी रोडलगत सायंकाळी सहा वाजता घडली.
सचिन तापकीरे (वय-30, रा. पिंपरी) असे गंभीर जखमी झालेल्य़ा तरूणाचे नाव आहे. सतीश सुनसुना (वय-24, मिलिंदनगर, पिंपरी), करण ओव्हाळ (वय-25) इतर एका असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पिंपरीतील साईराज रेफ्रीजरेशन कंपनी रोडलगत मित्रासमवेत गप्पा मारत थांबला होता. आरोपी सतीशने सचिनला 'तु माझ्याकडे रागाने का पाहतो' असे म्हणत चाकूने वार केले. त्याच्या दोन साथीदारांनी सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर जखमी केले. फौजदार सागर पाटील अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
एटीएम कार्ड नुतणीकरणाच्या बहाण्याने महिलेला दोन लाखांचा गंडा

व्हीएस न्यूज - बॅकेतून मॅनेजर बोलत असून 'तुमचे एटीएम कार्ड नुतणीकरण' करण्याचे सांगून एका 63 वर्षीय महिलेची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 22 ते 25 डिसेंबर 2017 या कालावधीत पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर फोन करून बॅंकेतून मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. 'तुमचे एटीएम कार्ड नुतणीकरण करायचे आहे,' असे खोटे सांगितले. त्यांच्या विश्वास संपादन करून कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून त्याकार्डव्दारे 1 लाख 99 हजार 994 रूपये ऑनलाईन काढून घेवून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
अंडाबुर्जीची गाडी बंद करण्यास सांगणाऱ्या बीट मार्शला शिवीगाळ

व्हीएस न्यूज - रात्री गस्तीवर असलेल्या बीट मार्शल पोलीसाने रात्री उशिरापर्यंत सुरू अंडाबुर्जीची गाडी बंद करण्यास सांगितल्यामुळे बुर्जी खाण्यास आलेल्या तीन दारूड्यांनी मार्शला शिवीगाळ करत पेव्हींग ब्लॉक फेकून मारला. ही घटना शुक्रवारी दीडच्या सुमारास सांगवी फाटा येथे घडली. महादेव किशोर गोरे (वय-35, संभाजीनगर, थेरगाव), सिध्देश्वर प्रभाकर कोटूळे (वय-40, रा. व्दारकाधिश रेसीडन्स, पिंपळे-गुरव), प्रसन्न विजय गायकवाड (वय-31 रा. औंध) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पोलीस नाईक केदारी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत फौजदार बागुल यांनी माहिती दिली. फिर्यादी नाईक हे शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास औंध ते सांगवी फाटा या परिसरात गस्त घालत होते. उशिरापर्यंत सुरू असलेली अंडाबुर्जीडी गाडी बंद करण्यास त्यांनी सांगितली. बुर्जी खाण्यास आलेल्या तिन दारूड्या आरोपींनी नाईक यांना आम्हाला अंडाबुर्जी खायची आहे. बुर्जीची गाडी कशाला बंद करण्यास सांगता म्हणत शिवीगाळ केली. तसेच नाईक यांच्या दिशेने पेव्हींग ब्लॉक फेकून मारला. परंतू, त्यांना इजा झाली नाही. आरोपींनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
बचत गटांना शुन्य टक्क्यांने कर्ज देण्याचा शासनाचा निर्णय – अमृता फडणवीस

सांगवीत पवनाथडी जत्रेचे उद्‌घाटन,

व्हीएस न्यूज – स्त्रीयांचे बचत गट १०० % कर्जाची परत फेड करतात. म्हणून सरकारचा त्यांच्यावर विश्वास असल्याने शुन्यटक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत ॲक्सिस बँक (पश्चिम भारत) च्या सहयोगी उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुरुवार दि. ४ जानेवारी ते सोमवार दि. ०८ जानेवारी २०१८ या कालावधीमध्ये पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्‌घाटन आज त्यांच्या हस्ते व पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्य विशेष उपस्थितीत झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली पी.डब्लू.डी. मैदान, नवी सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार,आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती फडणवीस म्हणाल्या, महिलांमध्ये बुद्धी कौशल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजार पेठ उपलब्ध करुन दिली असून महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव दिला आहे. त्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे प्रतिपादन ॲक्सिस बँक (पश्चिम भारत) च्या उपमुख्य कार्यकारी अध्यक्षा अमृता फडणवीस यांनी केले. बचत गटांच्या महिलांनी मार्केटिंगच्या माध्यमातून स्वतःला स्वावलंबी बनविले आहे. बचत गटामुळे महिला घर बसल्या बरेच उद्योग-धंदे करु शकतात, व स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. घरी बसुन स्वावलंबी होऊ शकतात. महिला बचत गटाच्या महिला 100 % कर्जाची परत फेड करतात. यामुळे बचत गटांच्या महिलांना शासन 0 % व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. महिलांना सर्वात जास्त शिक्षणाची गरज आहे. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते. भारतात स्त्रीयांचे प्रमाण सुमारे 50 % आहे. देशातील सर्व स्त्रीया सुशिक्षित झाल्यास या देशाला संपन्न होण्यासाठी हात भार लावतील. तेव्हा सर्व महिलांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे. पवनाथडी जत्रेसारख्या उपक्रमात महापालिका अव्वल क्रमांकावर आहे. महिला स्वतःचे घर सांभाळून त्या उत्तम प्रकारे मॅनेजर आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रकारच्या मॅनेजर आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गरजू महिलांना मदत करण्यातच जिवनाचे खरे सार्थक आहे. पुणे जिल्हा स्टार्ट अप मध्ये बंगलोर नंतर दुस-या क्रमांकाचे शहर आहे. महाराष्ट्रासह भारत देश लवकरच सुपर पावर होणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, पवनाथडी जत्रा या उपक्रमामध्ये बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ मिळावी म्हणून महापालिकेने स्टॉलस उपलब्ध करुन दिले आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रातील वेगवेगळे उद्योग, नवनविन कल्पना यांचा समावेश होऊन त्याचा फायदा बचत गटांना होत आहे. राज्य सरकार आणि समाज देखील महिलांच्या सबलीकरणास प्राध्यान्य देत आहे. महिलांमध्ये निसर्गतः कौशल्य असते. त्याचा फायदा या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाला होत आहे. महिलांना केंद्रबिंदु मानुन ह्या सगळ्या घटकांना उत्तेजन देण्याचे काम महापालिका करते. पिंपरी चिंचवड हे जगाच्या नकाशावर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. महिलांना या उद्योगासाठी लागणा-या वस्तु निर्माण करुन सहकार्य करता येईल त्यासाठी पुढाकार घ्यावा.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, महिला व बाल कल्याण समिती महिलांच्या उत्त्कर्षासाठी नेहमी चांगले निर्णय घेत असते. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम करण्यासाठी महापालिका सदैव कार्यरत आहे. मनपाच्या वतीने नुकताच अपंगासाठी दरमहा दोन हजार रुपये पेन्शन योजना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे महिला बचत गट चांगले व्यावसाय करतील त्यांना आगामी काळात भरीव अर्थसहाय्य केले जाईल. महिलांच्या हातात तिजोरीची चावी दिल्यास ते काट कसरीने खर्च करतात. पुणे शहरा सारखे पिंपरी चिंचवड शहरही वैभवशाली करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महिला व बाल कल्याण समिती सभापती म्हणाल्या, पवनाथडी जत्रेची सुरुवात सन २००८-०९ या वर्षा पासून झाली असून हे पवनाथडी जत्रेचे १० वे वर्ष आहे. महापालिका हद्दीतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट वैयक्तिक महिला, यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, एकूणच महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, याकरिता दरवर्षी पवनाथडी जत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना, महिला बचतगट उत्पादनांबाबत माहिती व्हावी, त्यामधून स्वत:चे उत्पादन सुरु करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी याकरिता शहरातील बचतगटांना या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येते. महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या सुक्या चटण्या, पापड, लोणची, जाम , जेली, विविध प्रकारचे मसाले, विविध गृहोपयोगी उत्पादने, दैनंदिन वापराच्या वस्तू, हस्तकला निर्मित उत्पादने यासारख्या वैशिष्टयपूर्ण उत्पादनांचा समावेश असतो. शिवाय अस्सल खवैय्यांसाठी खाद्य महोत्सव देखील आहे. यामध्ये चुलीवरचे वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, शाकाहारी मासवडी, मक्याचा हुरडा, खानदेशी पुरणाचे मांडे, झणझणीत चुलीवरचं मटण, खेकडा करी, कोंबडी वडे, दमबिर्याणी, कुरकूरीत मच्छी फ्राय अशा खास ग्रामीण मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद परिसरातील नागरिक घेतात. तसेच या जत्रेमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यामध्ये मराठी – हिंदी गीतांचा कार्यक्रम, महिलांसाठी “ स्मार्ट होम मिनिस्टर ” हा कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचा इतिहास लोकनृत्यातून सादर करणारी महाराष्ट्राची गौरवगाथा या कार्यक्रमांचा समावेश असतो. तसेच या जत्रेमध्ये पारंपारिक लोककला जपणारे वाघ्या-मुरळी, गोंधळी, वासुदेव, पिंगळा, इत्यादी कलाकार आपली लोककला सादर करतात. तसेच या जत्रेत बालचमूंचे आकर्षण ठरणारी विविध प्रकारची खेळणी, झुकझुक गाडी आणि उंच झेपावणारे पाळणेही असतात. या पवनाथडी जत्रेत एकूण स्टॉलची संख्या १०१२ इतकी आहे तर सहभागी बचतगटांची संख्या ८७२ इतकी आहे. यामध्ये बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे ४३४ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थांचे २१४ स्टॉल तर मांसाहारी पदार्थाचे इतके २१४ स्टॉल आहेत. एकूण स्टॉलच्या संख्येपेक्षा सहभागी बचतगटांची संख्या जास्त असल्याने स्टॉल

मिळण्यासाठी अर्ज करणा-या बचतगटांना सन्मा. पदाधिका-यांच्या हस्ते बंद चिठ्यांव्दारे सोडत काढून स्टॉलचे वाटप करण्यात आलेले असून एका स्टॉलमध्ये दोन बचतगट याप्रमाणे स्टॉल वाटप करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दरवर्षी साधारणपणे १ ते १.२५ कोटी रुपयांची विक्री होते व दररोज या जत्रेला किमान ५० ते ६० हजार नागरिक भेट देत असतात. या विक्री प्रदर्शनातून बचतगटातील महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा मिळत असून हे प्रदर्शन म्हणजे बचतगटांची उत्पादने लाखो ग्राहकांपर्यत कमी वेळेत पोहोचविण्याचे फार मोठे प्रभावी साधन आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व संदिप साकोरे यांनी केले. आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.

...Read More

V. S. News
महानरपालिकेच्या जनता विभागास प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश द्यावे – युवराज दाखले

व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे मोठ्या दिमाखात उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, शहराचे लोकप्रतिनिधी असलेले खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव पाटील तसेच आमदार गौतम चाबुकस्वार यांची नावे कुठलाही प्रोटोकॉल पाळुन टाकलेली नाहीत. तरी, याकडे गांभिर्यांने लक्ष देवून महापालिकेच्या जनता विभागाला प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिवसेना रहाटणी-काळेवाडी प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उद्‌घाटन केलेल्याकॉन्सिलवर जनतेने निवडुन दिलेले शिवसेनेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिरूळ लोकसभेचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील,आमदार गौतम चाबुस्कवार यांची नावे प्रोटोकॉलनुसार कॉन्सिलवर असणे अपेक्षीत आहे. परंतु महापालिकाप्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या बोटावर नाचून ती नावे खाली टाकलेली आहेत.

...Read More

V. S. News
रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल

व्हीएस न्यूज - डॉ. आंबेडकर चौकात मंगळवारी कोणतीही परवानगी न घेता तब्बल तीन तास पुणे-मुंबई महामार्ग रोखणाऱ्या आंदोलकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता चौकात जमाव जमा करणे, रास्ता रोको करणे, सरकार विरोधी घोषणा देणे याविरोधात सुमारे 300 ते 350 आंदोलकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणसही अटक केलेली नाही. या काळात अफवा पसरवणारे प्रक्षोभक वक्तव्य करणारे व तोडफोड करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करणार आहेत.

...Read More

V. S. News
टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; चार जण ताब्यात

व्हीएस न्यूज - मद्यधूंद अवस्थेतील चार जणांच्या टोळक्याने कॉलनीतील पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची कोयते, दगडांनी तोडफोड केली. यामध्ये आठ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पिंपळेगुरवमध्ये घडली. याबाबत बर्नाड चंद्रकांत मिरपगार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी मद्यप्राशान केले होते. बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आरोपींनी पिंपळेगुरव येथील ओंकार आणि मोरया कॉलनीत पार्किंगला लावलेल्या आठ वाहनांची कोयते, दगडांनी तोडफोड केली. यामध्ये आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. सांगवी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे पुढील तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
भडकावू भाषण दिल्याप्रकरणी जिग्नेश मेवानींविरोधात तक्रार

व्हीएस न्यूज - गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी यांनी रविवारी शनिवारवाड्यावर आयोजित परिषदेत वादग्रस्त वक्‍तव्य केल्यामुळेच भीमा कोरेगाव येथे दोन गटांमध्ये वाद झाला. मेवानी आणि जेएनयू छात्र संघटनेचे उमर खालिद हे या घटनेला जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार अक्षय बिक्‍कड आणि आनंद धोंड यांनी केली आहे.

शनिवारवाड्यावर भीमा कोरेगावच्या संग्रामाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या एल्गार परिषदेत त्यांनी भडकावू भाषण दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध डेक्‍कन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, पुढील कार्यवाहीसाठी तो विश्रामबाग पोलिसांकडे पाठवला आहे, असे डेक्‍कनचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले; पण विश्रामबागचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी अशा स्वरूपाची तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही, असे स्पष्ट केले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!