व्हीएस न्यूज - खडकी येथील महादेवघाट परिसरात नदीपात्रात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे वय सुमारे 22 ते 25 वर्षे असून त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा रेनकोट, मरून रंगाचा टीशर्ट, सफेद बनियन, अंडरवेअर, असून उजव्या पायात काळा दोरा बांधलेला आहे. या तरुणासंदर्भात कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी खडकी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार ए.बी. वर्पे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.