एटीएम कार्ड नुतणीकरणाच्या बहाण्याने महिलेला दोन लाखांचा गंडा
पिंपरी चिंचवड
2018-01-05
व्हीएस न्यूज - बॅकेतून मॅनेजर बोलत असून 'तुमचे एटीएम कार्ड नुतणीकरण' करण्याचे सांगून एका 63 वर्षीय महिलेची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 22 ते 25 डिसेंबर 2017 या कालावधीत पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर फोन करून बॅंकेतून मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. 'तुमचे एटीएम कार्ड नुतणीकरण करायचे आहे,' असे खोटे सांगितले. त्यांच्या विश्वास संपादन करून कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून त्याकार्डव्दारे 1 लाख 99 हजार 994 रूपये ऑनलाईन काढून घेवून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे अधिक तपास करत आहेत.