अंडाबुर्जीची गाडी बंद करण्यास सांगणाऱ्या बीट मार्शला शिवीगाळ
पिंपरी चिंचवड
2018-01-05
व्हीएस न्यूज - रात्री गस्तीवर असलेल्या बीट मार्शल पोलीसाने रात्री उशिरापर्यंत सुरू अंडाबुर्जीची गाडी बंद करण्यास सांगितल्यामुळे बुर्जी खाण्यास आलेल्या तीन दारूड्यांनी मार्शला शिवीगाळ करत पेव्हींग ब्लॉक फेकून मारला. ही घटना शुक्रवारी दीडच्या सुमारास सांगवी फाटा येथे घडली. महादेव किशोर गोरे (वय-35, संभाजीनगर, थेरगाव), सिध्देश्वर प्रभाकर कोटूळे (वय-40, रा. व्दारकाधिश रेसीडन्स, पिंपळे-गुरव), प्रसन्न विजय गायकवाड (वय-31 रा. औंध) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पोलीस नाईक केदारी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत फौजदार बागुल यांनी माहिती दिली. फिर्यादी नाईक हे शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास औंध ते सांगवी फाटा या परिसरात गस्त घालत होते. उशिरापर्यंत सुरू असलेली अंडाबुर्जीडी गाडी बंद करण्यास त्यांनी सांगितली. बुर्जी खाण्यास आलेल्या तिन दारूड्या आरोपींनी नाईक यांना आम्हाला अंडाबुर्जी खायची आहे. बुर्जीची गाडी कशाला बंद करण्यास सांगता म्हणत शिवीगाळ केली. तसेच नाईक यांच्या दिशेने पेव्हींग ब्लॉक फेकून मारला. परंतू, त्यांना इजा झाली नाही. आरोपींनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.