व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. मात्र, शहराचे लोकप्रतिनिधी असलेले खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव पाटील तसेच आमदार गौतम चाबुकस्वार यांची नावे कुठलाही प्रोटोकॉल पाळुन टाकलेली नाहीत. तरी, याकडे गांभिर्यांने लक्ष देवून महापालिकेच्या जनता विभागाला प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिवसेना रहाटणी-काळेवाडी प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उद्घाटन केलेल्याकॉन्सिलवर जनतेने निवडुन दिलेले शिवसेनेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिरूळ लोकसभेचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील,आमदार गौतम चाबुस्कवार यांची नावे प्रोटोकॉलनुसार कॉन्सिलवर असणे अपेक्षीत आहे. परंतु महापालिकाप्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या बोटावर नाचून ती नावे खाली टाकलेली आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002