राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा आज पिंपळेगुरवमध्ये मेळावा
पिंपरी चिंचवड
2018-01-05
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा युवक मेळावा आज (शनिवारी) पिंपळे गुरव येथे होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली. या मेळाव्यात नवीन पदनियुक्त्या केल्या जाणार आहेत.
पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्य मंदिरात शनिवारी दुपारी चार वाजता हा युवक मेळावा होणार आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष संजोग वाघेरे असणार आहेत.