व्हीएस न्यूज - घरात जबरदस्तीने घुसून एकाने महिलेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. महिलेकडील 36 हजारांचे मोबाईल हिसकावून नेले. लॅपटॉपचे नुकसान केले. ही घटना वाकड येथे सोमवारी रात्री साडेबारा वाजता सुखासा सोसायटीत घडली.
दिग्विजय सुनिल राजुरकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. महिलेकडील 36 हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेले. तसेच लॅपटॉपचेही नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. घोळवे अधिक तपास करत आहेत.