व्हीएस न्यूज - दुकानासमोर मित्रासमवेत गप्पा मारत थांबलेल्या तरूणाला 'तु माझ्याकडे रागाने का पाहतो' असे म्हणत एकाने चाकूने वार केले. त्याच्या दोन साथीदारांनी सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना पिंपरीतील साईराज रेफ्रीजरेशन कंपनी रोडलगत सायंकाळी सहा वाजता घडली.
सचिन तापकीरे (वय-30, रा. पिंपरी) असे गंभीर जखमी झालेल्य़ा तरूणाचे नाव आहे. सतीश सुनसुना (वय-24, मिलिंदनगर, पिंपरी), करण ओव्हाळ (वय-25) इतर एका असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पिंपरीतील साईराज रेफ्रीजरेशन कंपनी रोडलगत मित्रासमवेत गप्पा मारत थांबला होता. आरोपी सतीशने सचिनला 'तु माझ्याकडे रागाने का पाहतो' असे म्हणत चाकूने वार केले. त्याच्या दोन साथीदारांनी सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर जखमी केले. फौजदार सागर पाटील अधिक तपास करत आहेत.