व्हीएस न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार तोळे सोने, 20 हजारांची रोकड असा एक सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी पिंपरीत उघडकीस आली. याप्रकरणी संपत सिताराम पवळ (वय-30, रा. कामगार नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी माहिती दिली. फिर्यादी पवळ हे 10 जानेवारी रोजी बाहेरगावी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील लाख रूपये किंमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने, 20 हजारांची रोकड असा एक लाख 20 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.