ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलमध्ये कमीत कमी ऍप ठेवा
खडकी
2018-01-18
व्हीएस न्यूज - फेसबुक व्हॉंट्सअँपवर अधिक मित्र व + 9 सोडुन येणारे कॉंल टाळा, आपले अकाउंट हॅंक होऊ नये याकरिता आपला पासवर्ड मजबुत ठेवा, मोबाईलवर जेवढे अधिक अँप असतील, त्यामुळे कमीत-कमी ऍप ठेवा, अशा प्रकारचे महत्वपुर्ण व मोलाचे मार्गदर्शन पुणे रेल्वे पोलिसांतर्फे बुधवारी येथे आयोजित जनजागृती अभियाना प्रसंगी आले.
पुणे रेल्वे पोलिस व अँक्सिज बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या ट्रान्सफॉंर्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमाद्वारे व राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या सुचनेनुसार खडकी येथिल रेल्वे पोलिस मुख्यालयात बुधवारी सायबर गुन्हे विषयी जनजाग्रुती आभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधिक्षक प्रभाकर बुधवंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलिस अधिक्षक तुषार पाटील, नंदकुमार घोरपडे, उप विभागिय पोलिस अधिकारी सोलापुर नंदकुमार भोसले, पोलिस निरिक्षक चंद्रकांत भोसले, अनिल दबडे, मौला सय्यद, खंडागळे, बाविस्कर, सहाय्यक पोलिस निरिक्षक समाधान पवार, पोलिस उपनिरिक्षक बबन गायकवाड, यासह अँक्सिज बॅंकेंचे वरिष्ठ अधिकारी अशोक जॉंन प्रसाद गायकवाड, टि.जे.महाविद्याल याचे उप प्राचार्य व्ही. पी. मोरे, प्रा.शुभांगी पाटील महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक काळात सोशल मिडीयासह इंटरनेटचा वापर व प्रभाव सर्व क्षेत्रात वाढला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हे ही वाढु लागले आहेत. नागरिकांचा पैसा व खाजगी गोपनिय माहिती याला ही त्याची झळ बसु लागली आहे. या संकटाचा सामना करुन सायबर गुन्ह्यांना कशा प्रकारे आळा घालता येईल यासंबधी जनतेमध्ये जनजागृती करण्याचा ध्यास व संकल्प राज्य शासन व राज्य पोलिसांनी घेतला आहे. सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर पालबांडे म्हणाले की, आपला मेंदु हाच आपला पासवार्ड व्यवस्थापक आहे. तो मजबुत ठेवा मोबाईलवर जेवढे अधिक अँप असतील तेवढा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मोजके व गरजेपुरतेच अँप वापरा. फेसबुक व व्हॉंट्सअपवर अधिक मित्र हानिकारक आहे. विचारपुर्वक फ्रेंड रिक्वेष्ट स्विकारा. सध्या एखाद्या अग्रक्रमांकीत कंपनी संस्थाच्या नावे खोटी आर्थिक लोभाची स्पॅंमद्वारे फसवणुक केली जाते. तेव्हा स्पॅंमवर विश्वास ठेवु नका. जेवढे आँन लाईन रहाल तेवढे आपले लोकेशन सेटींग होण्याची भिती असुन त्याद्वारे अकाऊंट हॅंक होण्याची दाट शक्यता आहे. फेसबुक व व्हाट्सअपवर आपल्या वैयक्तीक व घरगुती भावना शेअर करणे टाळा. + 9 सोडुन येणारे कॉंल अटेंड करु नका अशा प्रकारची महत्वपुर्ण माहिती व सुचना उपस्थितांना पालबांडे यांनी केली.
यावेळी पोलिस अधिकारी विद्यार्थी व नागरिकांनी काही प्रश्न व शंका उपस्थित केल्या. पालबांडे यांनी घडलेले सायबर गुन्हे व त्यांचा कशा प्रकारे छडा लावला याच्या उदाहरणासह त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. अँक्सिस बॅंकेचे अधिकारी जॉंन यांनी ही बॅंकेतील अकाऊंट हॅंक करुन आर्थिक फसवणुक कशी केली जाते एटीएम कार्डचे पासवर्ड कशा प्रकारे हॅंक करुण आर्थिक फसवणुक केली जाते याची सविस्तर माहिती दिली. फसवणूक टाळण्याकरिता कशा प्रकारे सतर्रकता बाळगावी, याबाबत मार्गदर्शन केले. प्रस्तावाना व आभार वरिष्ठ पोलिस निरिक्षक (गुन्हे)अनिल दबडे यांनी मानले.