व्हीएस न्यूज - ग्लोबल मार्केटिंग मॅनेजमेंट डीडब्ल्यू एलआयसी युएई कंपनीचे भारतातील आयातदार व वितरण बनविण्याचे अमिष दाखवून पिंपरीतील एका व्यावसायिकाला तब्बल 48 लाखांना गंडविले आहे. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. गिरीष तेजवाणी (वय-34, रा. वैष्णवीदेवी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल मार्केटिंग मॅनेजमेंट डीडब्ल्यू एलआयसी युएई कंपनीचे भारतातील आयातदार व वितरण बनविण्याचे अमिष दाखविले. तसेच एफ 'बिर्व्हेजेस' या कंपनीचे 2017-18 या कालावधीत मद्यार्क पेय न देता 48 लाखांची फसवणूक केली. फौजदार ठुबल अधिक तपास करत आहेत.