व्हीएस न्यूज - पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची गुन्हेगार कार्यप्रणाली (एमओबी) येथे त्यांच्या जागी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांची तर त्यांच्या जागी सतीश माने यांची बदली झाली आहे. भोसरीचे संपत भोसले यांची वाहतुक शाखेत, त्यांच्या जागी नरेंद्र जाधव, सांगवीचे अरविंद जोंधळे यांची विशेष शाखा, त्यांच्या जागी प्रसाद गोकुळे यांची बदली करण्यात आली आहे. यासह आदीच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.