व्हीएस न्यूज - आकुर्डी स्टेशनकडून मनपाकडे जाणारी पीएमपीएएलचे स्टेअरिंग रॉडचा बोल्ट वळणावरच अचानक तुटला. त्यामुळे ब्रेकही लागत नसल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस दुभाजकावर चढवली. अन् मोठा अनर्थ टळला. हा प्रकार सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुला शेजारी शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डी स्टेशनकडून मनपाकडे जाणाऱ्या पीएमपीएमएलची बस (एमएच 14. 9984) सकाळी सव्वा सातच्या सुमारास सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुलाजवळून जात होती. बसचा स्टेअरिंग रॉडचा बोल्ट वळणावरच अचानक तुटला. त्यामुळे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालक पांडुरंग सांगळे यांनी प्रसंगावधान दाखवत बस दुभाजकावर चढवून थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ ठळला. परंतू, बस दुभाजकावर चढल्यामुळे वाहक भागवत खेडकर यांच्या हाताला मुक्का मार लागला आहे. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी होते. यामुळे या मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. "शिस्तीच्या नावाखाली कामगारांवर कडक कारवाई करणारे पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक तुकाराम मुंढे यांनी कर्तव्यदक्ष चालकाचा सत्कार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युवराजसिंह गायकवाड यांनी केली आहे.