व्हीएस न्यूज - दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना खडकी रेल्वे स्टेशन मागे बोपोडीत गुरूवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. प्रकरणी 63 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या गुरूवारी दुपारी आपल्या मैत्रींच्या घरी रिक्षाने गेल्या होत्या. बोपोडी येथे त्या रिक्षातून उतरल्या. दुचाकीवरून त्यांच्याजवळ दोघे आले. पत्ता विचारण्याचा बहाणा करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 94 हजार 500 रूपयांचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. फौजदार एस. व्ही महाडिक अधिक तपास करत आहेत.