व्हीएस न्यूज - नोकरी डॉट कॉम संकेतस्थळावरून उच्च शिक्षित तरूणीची माहिती घेवून एकाने तरूणीला नामाकिंत कंपनीतून बोलत असून 'तुमचे रिझुम शॉर्टलिस्ट झाले आहे' असे खोटे सांगितले. मुलाखतीपुर्वी टोकन रक्कम म्हणून 26 हजार रूपये पेटीएमवर जमा करण्यास सांगून फसवणूक केली. मानसी राजेंद्र ठाकुर (वय-23, रा. धनकवडी, पुणे) हिने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसीने नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले रिझुम अपलोड केले होते. ती नोकरीच्या शोधात होती. नोकरी डॉट कॉम संकेतस्थळावरून माहिती घेवून आरोपीने तिच्या मोबाईवर संपर्क साधला. एका नामाकिंत कंपनीतून बोलत असल्याचे सांगून आरोपीने 'तुमचे रिझुम शॉर्टलिस्ट झाले आहे' असे खोटे सांगितले. मुलाखतीपुर्वी टोकन रक्कम म्हणून वेळोवेळी 26 हजार 80 रूपये पेटीएम खात्यावर भरण्यास सांगून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले अधिक तपास करत आहेत.