Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
औद्योगिकनगरीत रविवारी ‘सायकल चालवा’ संदेश रॅली

व्हीएस न्यूज - वातावरणातील प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वाढ आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून प्रदुषणावर उपाय म्हणून नागरिकांनी इंधनावरील वाहनांचा वापर कमी करुन सायकलाचा जास्तीत-जास्त वापर करावा यासाठी येत्या रविवारी (दि.४)‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो सायकलस्वार सहभागी होऊन औद्योगिकनगरीत सायकल चालवा हा संदेश देणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष बिमल रावत यांनी दिली.

सायकलिंगसाठी ५, १५ आणि ३० किलोमीटर असे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या उपक्रमाची रविवारी सकाळी सात वाजता निगडी, प्राधिकरणातील सेक्टर २७ येथील महापौर बंगल्यासाठी राखीव असलेल्या मैदानातून सुरुवात होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ‘झेंडा’ दाखवून सायकलिंगच्या जनजागृतीला सुरुवात होणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे उपस्थित असणार आहेत.

”जवळचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांनी सायकलचा वापर करावा. त्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. तसेच सायकलिंग केल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. चांगल्या वातावरणासाठी, सदृढ आरोग्यासाठी आणि निखळ आनंदासाठी सायकल चालवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही शहरवासियांना सायकल चालविण्याचे ‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत”, असे बिमल रावत यांनी सांगितले.

३० किलोमीटरसाठी निगडी भेळ चौक-बिग इंडिया चौक-हुतात्मा चौक, भोंडवे कॉर्नर-रावेत पूल, डांगे चौक- जगताप डेअरी चौक, कोकणे चौक, नाशिक फाटा पूल-भोसरी लांडेवाडी चौक,केएसबी चौक-थरमॅक्स चौक-यमुनानगर, भक्ती-शक्ती चौक-भेळ चौक असा असणार आहे. १५ किलोमीटरसाठी याच मार्गे डांगे चौकमधून चिंचवडगाव मार्गे आकुर्डी ते प्राधिकण असा असणार आहेत. तर, ५ किलोमीटरसाठी प्राधिकरणातील मार्ग निश्चित केला आहे.

कार्यक्रमाची सांगता निगडी येथे होणार आहे. समारोपावेळी पिंपरी चिंचवड शहरातील पहिले पद्मश्री पुरस्कार विजेते मुरलीकांत राजाराम पेटकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड व पुणे शहरामधील सायकलिंग, पर्यावरण, गिर्यारोहण, समाजकार्य या क्षेत्रामधील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या उपक्रमानिमित्त मिळणा-या निधीचा वापर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील खरपुड व खोपेवाडी या दुर्गम भागातील दोन छोट्या गावांमध्ये आंनदी ग्राम या नावाने सुरु असणा-या विकास कामांसाठी करणार आहेत. आजपर्यंत रोटरीने या गावांमध्ये जलसंधारण, किफायतशीरदार शेती, फायदेशीर पशुपालन, आरोग्य शिक्षण, शिक्षण या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले आहे.

या उपक्रमाच्या संयोजनात रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष बिमल रावत, आनंदी ग्राम प्रकल्प प्रमुख धनंजय भिंगे, नितीन ढमाले, ‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाचे प्रमुख विजयकुमार नाईक, संदीप डांगे, सदानंद नायक, अतुल भोंडवे, संतोष गिरंजे, मेहुल परमार तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.

...Read More

V. S. News
‘बीव्हीजी’ तर राष्ट्रवादीची ‘पिलावळ’ – एकनाथ पवार…

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप बिनबुडाचे आहे. शवदाहिनीत भ्रष्टाचार करणा-या प्रशांत शितोळेंनी आमच्यावर टिका करू नये. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आलेली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. ‘बीव्हीजी’ तर राष्ट्रवादीची ‘पिलावळ’ असल्याची घणाघाती टिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महापौर नितीन काळजे, नगरसेवक बाबा त्रिभुवन उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा संभाव्य घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करुन भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढायचा आहे. भाजपवाले‘अँनाकोंडा’ असून कचर्यातले पैसे गिळून टाकत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. तसेच करदात्यांच्या पैशांची लूट कदापि सहन केली जाणार नाही. या निविदेमुळे महापालिका भिकारी बनणार आहे. त्यामुळे त्याची फेरनिविदा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केली होती. त्याला आज सभागृह नेत्यांनी पत्रकार परिषेद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ पवार म्हणाले, कचरा संकलन वहनाबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. बीव्हीजी ही संस्था राष्ट्रवादीची पिलावळ आहे. बीव्हीजीला राष्ट्रवादीने महापालिकेला आंदण दिले आहे. महापालिकेच्या सर्वंच विभागातील कामे बीव्हीजीला दिली आहेत. या कामाबाबत महापालिका आयुक्त सविस्तर खुलासा करतील. राष्ट्रवादीने भाजपची बदनामी थांबवावी. अन्यथा राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढली जातील, असा इशाराच सभागृह नेते पवार यांनी दिला.

...Read More

V. S. News
रहाटणीत ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर शनिवारी व्याख्यान

व्हीएस न्यूज - दिवंगत लोकनेते गोपनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहर लोकनेते गोपीनाथ मुंडे जंयती समितीतर्फे येत्या शनिवारी (दि.३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होणार आहे.

रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी चार वाजता होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत. यावेळी महापौर नितीन काळजे, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, भाजपच्या सचिव उमा खापरे, संघटन मंत्री सुनील कर्जतकर, रवी अनासपुरे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पीएमआरडीएचे अध्यक्ष किरणकुमार गीते, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलाजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आदी उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी चार वाजता ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि आळंदी नगरपरिषदेत भाजपची सत्ता यावी, अशी गोपीनाथ मुंडे यांची इच्छा होती. महापालिका आणि नगरपरिषदेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली. पुणे महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरीचे नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजंयती उमरगेकर, पायलट रमीला लटपटे यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनात लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती पिंपरी चिंचवड समितीचे शहर जिल्हा निमंत्रक व भाजपच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य सदाशिव खाडे, उद्योजक आबाशेठ नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक रघुनंदन घुले, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक नागरगोजे,भगवान सेना पिंपरी-चिंचवड, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठण पुणे, मराठवाडा मित्र मंडळ, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्टाण पिंपरी चिंचवड, लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंच पिंपरी चिंचवड, बीड जिल्हा मित्र मंडळ, मराठवाडा जन विकास संघ पिंपरी चिंचवड, भगवान बाबा मित्र मंडळ, जय भगवान महासंघ यांनी पुढाकार घेतला आहे.

या कार्यक्रमाला पुणे, पिंपरी चिंचवड परिसराती मुंडे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9923103459 अथवा 8888880007 यांच्याशी संपर्क साधावा.

...Read More

V. S. News
‘सीडीएस’ परीक्षेत पुण्याची श्रुती श्रीखंडे देशात पहिली

व्हीएस न्यूज - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या असून पुण्यातील आयएलएस कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून तोंडी आणि लेखी परीक्षेचा यात समावेश असतो. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. तिचे शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १०७ व्या तुकडीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. चेन्नईत नॉन टेक्निकल कोर्ससाठी श्रुतीची निवड झाली. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.

...Read More

V. S. News
अरेरे...पोलीस महिलेनेच चोरली अपघातग्रस्त दुचाकीतील रोकड

व्हीएस न्यूज - रस्त्यावर अपघातानंतर अपघातग्रस्त दुचाकीच्या डिक्कीमधील पन्नास हजार रूपयांची रोकड चक्क पोलीस महिलेने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवारी घडला असून आवारातील सीसीटीव्हीमध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पोलीस महिलेला पोलीसांनी अटक केली आहे.
स्वाती जाधव (रा. चाकण) असे अटक केलेल्या पोलीस नाईक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रणिता नंदकिशोर बेंद्रे (वय 21, रा. परंदवडी, ता. मावळ) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव पोलीस ठाण्यासमोर मोटारीने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांचे वडील नंदकुमार बेंद्रे हे किरकोळ जखमी झाले. त्यांना त्वरीत सोमाटणे फाटा येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक स्वाती जाधव यांनी अपघातग्रस्त दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये लावली. यावेळी जाधव यांनी बेंद्रे यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये असलेली 50 हजार रुपयांची रोख रक्कम काढून स्वतःकडे ठेवली. जखमी बेंद्रे यांनी आपल्या मुलीला गाडीच्या डिक्कीमध्ये पन्नास हजार रूपये असल्याचे सांगितले. त्यांनी त्वरीत पोलीस ठाणे गाठत डिक्की उघडून पाहिली. मात्र, डिक्कीत पैसे आढळून आले नाहीत. पोलीसात फिर्याद दिल्यानंतर तळेगाव पोलीस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्हीत ह आरोपी जाधव यांनी पैसे चोरल्याचे दिसून आले. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
...Read More

V. S. News
अर्धा, एक गुंठ्यात बांधकामासाठी परवानगी द्या, अनधिकृत बांधकामे होणार नाहीत

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. प्राधिकरण, ग्रीन झोन, रेड झोन व नदी काठचा 100 मीटरचा भाग सोडून महापालिकेने अर्धा, एक गुंठ्यात बांधकाम करण्याची जलद परवानगी द्यावी. त्यानंतरच शहरासह इतर ठिकाणी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरू आहेत. परंतू, शहरात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊ लागली आहेत. यातूनच पिंपळे-गुरव मध्ये काही दिवसांपुर्वी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास विरोध करत महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. ही शहरासाठी दुर्देवी घटना आहे. परंतू, सरकारही अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी शुल्क भरा मोकळे व्हा, या नितीमुळे अनधिकृत बांधकामांना एक प्रकारे उत्तेजन असल्याचा आरोप बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच अनधिकृत बांधकामांना राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याचेही दिसून येते. त्यामुळेच शहरात अनधिकृत बांधकामे, झोपडपट्यांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप बकाल यांनी केला आहे.
...Read More

V. S. News
'विद्यार्थ्यांनी संवेदनशिलता जागृत ठेवावी'

व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांनी संवेदनशिलता जागृत ठेवून आई-वडिलांची सेवा करावी, असे आवाहन न्यू. इंग्लिश स्कूल माध्यमिक व आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका विद्या कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केले.
न्यू. इंग्लिश स्कूल माध्यमिक व आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक निळकंठ चिंचवडे, माजी प्रशासन अधिकारी विष्णू जाधव, निलिमा कन्हेरे आदी उपस्थित होते.
शिक्षण हे जीवनाला कलाटणी देणारे वळण असून यश प्राप्ती करून ध्येय साधावे, असे मनोगत निळकंठ चिंचवडे यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन व आभार माधवी कुलकर्णी यांनी केले.
...Read More

V. S. News
'तुझ्याविना', 'जीवनगाणे' या कवितासंग्रहांचे रविवारी प्रकाशन

व्हीएस न्यूज - साहित्यसुधा आणि सूरज पब्लिकेशन, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'तुझ्याविना' या गझलसंग्रहाचे आणि 'जीवनगाणे' या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन येत्या रविवारी निगडी येथे होणार आहे.
येथील कै.जी.एस.कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख (पनवेल) यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र साहित्य परिषद शाखाध्यक्ष राजन लाखे, ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत हुईलगोळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रकाशनानंतर ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. विनामूल्य असणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने दादा इंचलकर आणि राजेश जैन यांनी केले आहे.
...Read More

V. S. News
पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांच्यावर कारवाई करा

व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहन करण्यात आले. परंतु या ध्वजारोहन प्रसंगी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने ध्वजाला देण्यात येणारी प्रथम सलामी तळेगाव पोलीसांनी दिली नाही. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रजासत्ताकदिनी सकाळी 8 वा 15 मिनिटांनी नगरपरिषद तळेगाव दाभाडे येथे ध्वजारोहनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्व प्रथम तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने ध्वजाला सलामीची मानवंदना दिली जाते व नंतर नगराध्यक्षाच्या हस्ते ध्वजारोहन होते. मात्र यावर्षी हि प्रथा खंडित झाली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तळेगावचे माजी नगराध्यक्ष ऍड रविंद्र दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी निवेदनाव्दारे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, संदीप शेळके, अमोल शेटे, संतोष शिंदे, इंद्रमल ओसवाल, नगरसेविका विभावरी दाभाडे, शोभा भेगडे, प्राची हेंद्रे, संध्या भेगडे, काजल गटे, मंगल जाधव, नीता काळोखे, कल्पना भोपळे, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, सुजाता खेर, तळेगाव शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, रजनी ठाकूर आदींच्या स्वाक्षरी आहेत. याबाबत जबाबदार व्यक्तीवर योग्य ती कारवाई न केल्यास जन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे निवेदनात नमूद केले आहे.
...Read More

V. S. News
पिंपळे निलखमध्ये भरदिवसा घरफोडी; 24 लाखांचा ऐवज चोरीला

व्हीएस न्यूज - भर दिवसा स्वयंपाकघराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरूममधील तीन कपाटातील 35 हजारांची रोकडसह सोन्याचे दागिने असा तब्बल 24 लाख 34 हजार 165 रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना बुधवारी पिंपळे निलख येथे घडली.
करिपाल जोसेफ थॉमस (वय 63, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिपाल जोसेफ थॉमस व त्यांच्या पत्नी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घर कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्याने स्वयंपाकघराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील 807.905 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 24 लाख, 34 हजार 165 रुपयांचा ऐवज चोरला. सायंकाळी थॉमस साडेपाच वाजता घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
...Read More

V. S. News
पैशांची पेटी रिकामी सापडली ; 74 लाखांची रोकड घेऊन चालक पसार

घटनेला 24 तास उलटूनही आरोपीचा थांगपत्ता नाही

व्हीएस न्यूज -
एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले 74 लाख रुपये घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ऍक्सिस बॅंकेच्या रहाटणी येथील शाखेमध्ये घडली होती. पैशांची रिकामी पेटी शिक्रापूरच्या पुढे सापडली असून आरोपी चालक पसार झाला आहे. या घटनेला चौवीस तास झाल्यानंतर पोलीसांनी आरोपीचा थांगपत्ता लागला नसल्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
रणजित धर्मराज कोरेकर (रा. सनशाईन हॉटेलजवळ, माऊलीनगर दिघी मूळ रा. मु.पो. नारेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे या व्हॅन चालकाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील ऍक्सिस बॅंकेच्या शाखेमध्ये असलेल्या एटीएममध्ये भरण्यासाठी 74 लाखांची रोकड घेऊन व्हॅन चालक व एक सुरक्षा रक्षक आले होते. सुरक्षा रक्षक गाडीतून खाली उतरताच व्हॅनचालक कोरेकर याने व्हॅनसहित 74 लाखांची रोकड घेऊन पसार झाला.
संबंधित कंपन्यांचे सक्षम अधिकारी घटनास्थळी येण्यासाठी व त्यांना माहिती मिळण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे पोलिसांना वर्दी देखील उशिराच मिळाली. याचा फायदा घेत चालक व्हॅन व रोकडसह शहराबाहेर लवकरच पसार झाल्याची चर्चा होऊ लागली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसहित वाकड व सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून व्हॅनचा शोध सुरु केला. आरोपी कोरेकर याने पळवून नेलेली व्हॅन भोसरी येथे एका कंपनीजवळ आढळून आली. तर शिक्रापूरच्या पुढे पैसे ठेवलेली लोखंडी रिकामी पेढी आढळली आहे. पेढीमध्ये नोटांच्या बंडलवर लावण्यात आलेल्या पावत्या देखील सापडल्या आहेत. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
भाजपा सरकारच्या विरोधात मोरवाडी चौकात निदर्शने

व्हीएस न्यूज - केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारची आश्वासने देऊन फसवणूक करित आहे. प्रामुख्याने पेट्रोल व डिजेल या अनावश्यक वस्तुंवर जीएसटी लागून वेळोवेळी दरवाढ केली जात आहे. तसेच, रहाटणी - काळेवाडी परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत करून प्रस्थापित राजकीय पुढारी जनतेला वेठीस धरत आहेत.

त्याचप्रमाणे भाटनगर- पिंपरी परिसरात स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्त पिंपरी मोरवाडी चौकातील राजमाता अहिल्यादेवी पुतळा परिसरातशिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बुधवार दि. ३१ रोजी निदर्शने करण्यात आली. या संदर्भात पिंपरी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रवीण आष्टेकर यांना निवेदन देऊन १५ दिवसांची मुदत देण्यात आली .

यावेळी शिवसेना विभाग प्रमुख खंडु शिरसाठ, लहु तिकोने, शिवसेना प्रणित शिव व्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले, शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना उपशहरप्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, गोरख पाटील ,चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, बाळासाहेब गायकवाड, नाना गायकवाड,दत्ता गिरी, रोहीदास तांबे, दिपक कांबळे, माऊली जाधव, भोसरी विधानसभा प्रमुख भरत इंगळे, पिलाभाऊ बनसोडे, नितीन गायकवाड, अजय कांबळे,अरूण गायकवाड, तुकाराम शिंदे, अक्षय थोरात, सोनु शिरसाठ, पुणे जिल्हा महीला संघटीका अनुजा शिंदे, महीला शहर संघटीका भाग्यश्री मस्के, संजय गांधी निराधार योजना पिंपरी विधानसभा सदस्या सारीका तामचीकर, सिमा रावळकर, अनुसया तापचिकर, सोनी भाट , गिता माच्छरे, ममता माच्छरे,मंदाकिनी मोरे, मनिषा मगर, लक्ष्मी कांबळे आदी उपस्थित होते.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!