व्हीएस न्यूज - भर दिवसा स्वयंपाकघराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरूममधील तीन कपाटातील 35 हजारांची रोकडसह सोन्याचे दागिने असा तब्बल 24 लाख 34 हजार 165 रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना बुधवारी पिंपळे निलख येथे घडली. करिपाल जोसेफ थॉमस (वय 63, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिपाल जोसेफ थॉमस व त्यांच्या पत्नी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घर कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्याने स्वयंपाकघराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील 807.905 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 24 लाख, 34 हजार 165 रुपयांचा ऐवज चोरला. सायंकाळी थॉमस साडेपाच वाजता घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.