व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. प्राधिकरण, ग्रीन झोन, रेड झोन व नदी काठचा 100 मीटरचा भाग सोडून महापालिकेने अर्धा, एक गुंठ्यात बांधकाम करण्याची जलद परवानगी द्यावी. त्यानंतरच शहरासह इतर ठिकाणी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरू आहेत. परंतू, शहरात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊ लागली आहेत. यातूनच पिंपळे-गुरव मध्ये काही दिवसांपुर्वी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास विरोध करत महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. ही शहरासाठी दुर्देवी घटना आहे. परंतू, सरकारही अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी शुल्क भरा मोकळे व्हा, या नितीमुळे अनधिकृत बांधकामांना एक प्रकारे उत्तेजन असल्याचा आरोप बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच अनधिकृत बांधकामांना राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याचेही दिसून येते. त्यामुळेच शहरात अनधिकृत बांधकामे, झोपडपट्यांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप बकाल यांनी केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002