व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांनी संवेदनशिलता जागृत ठेवून आई-वडिलांची सेवा करावी, असे आवाहन न्यू. इंग्लिश स्कूल माध्यमिक व आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका विद्या कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केले.
न्यू. इंग्लिश स्कूल माध्यमिक व आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक निळकंठ चिंचवडे, माजी प्रशासन अधिकारी विष्णू जाधव, निलिमा कन्हेरे आदी उपस्थित होते. शिक्षण हे जीवनाला कलाटणी देणारे वळण असून यश प्राप्ती करून ध्येय साधावे, असे मनोगत निळकंठ चिंचवडे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार माधवी कुलकर्णी यांनी केले.